पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 June
Follow

देशाच्या ऊस गाळपात घट

देशातील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. देशाचे ऊस गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी झाले आहे. यंदा ३१३७ लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा विशेष करून उत्तर प्रदेशात गाळप घटले. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये १०९१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ९७७ लाख टन उसाचे गाळप झाले. कर्नाटकात ५८० लाख टनांचे गाळप झाले होते ते यंदा ५६५ लाख टनांवर आले. गुजरात मध्ये ९५ लाख टन झाले होते ते यंदा ८९ लाख टनांवर आले आहे. आंध्र प्रदेशात दोन लाख टनांची भेंट आहे. महाराष्ट्र मात्र १६ लाख टनांनी ऊस गाळप वाढले आहे. उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत उसाच्या गाळपात घट झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या गाळपावर ही झाला आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ