देशात आवक वाढली; लासलगाव, पिंपळगाव आणि पुण्यात असे आहेत कांदा बाजारभाव

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या साप्ताहिक अहवालानुसार लासलगाव बाजारातील लाल कांद्याच्या किंमती थोड्याफार फरकाने वधारलेल्या दिसत आहेत. या सप्ताहात संपूर्ण देशभरातील कांदा आवक वाढली असून मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्मार्ट प्रकल्पाने नोंदविले आहे. आज दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची 8670 क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव 800 रुपये असा होता. तर सरासरी भाव 1850 रुपये असा मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याची आज सकाळी 14 हजार 400 क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये इतका मिळाला. मनमाड येथे लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजे 200 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी बाजारभाव मिळाला.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
