पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Mar
Follow

देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या बाजारात सुधारणा दिसून आली होती. सोयाबीनच्या वायद्यांनी सीबाॅटवर दीड महिन्यानंतर पुन्हा 12 डाॅलरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर आज दिवसभर वायद्यांमध्ये चढ उतार होत राहीले. तर देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सचे भाव 20 ते 50 रुपयांनी वाढले होते. मात्र बाजार समित्यांमधील भावपातळी आजही 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपयांवर कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील सुधारणा टिकून राहील्यास देशातील बाजारातही वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ