पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Nov
Follow
देशातील केळी निर्यातीची गती कायम
केळी निर्यातीत देशातून यंदाही वाढ दिसत आहे. केळी निर्यातीत राज्यानेही चांगली कामगिरी केली असून, सोलापूरचा त्यात पहिला क्रमांक कायम आहे. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत देशातून सुमारे २५ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली. २०२२-२३ च्या तुलनेत ही निर्यात सुमारे साडेसात ते आठ हजार कंटेनरने वधारली आहे. केळी निर्यात कायम आहे. इस्राईल व आखातात तणाव असल्याने निर्यातीसंबंधी अडचणी आहेत. सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेला वळसा घालून निर्यात सुरू आहे. यात निर्यातीसंबंधी भाडेवाढ झाल्याने निर्यातीच्या केळीचे दर मात्र कमी आहेत किंवा त्यात मोठी वाढ झाली नाही.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ