पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
19 Sep
Follow

जनावरांचे जंतनिर्मूलन ठराविक वेळेत करणे आवश्यक (Deworming of animals must be done within a certain time)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

आरोग्य व्यवस्थापन उत्तम राहिले तर जनावरे कोणत्याही आजारांना बळी पडत नाही व त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही. जनावरांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील एक मुख्य समस्या म्हणजे जनावरांना होणारी जंतबाधा. जनावरांच्या आतड्यात निरनिराळ्या प्रकारचे जंत (कृमी) वास्तव्य करतात. हे जंत या जनावरांना मिळणाऱ्या अन्नघटकातून आपला उदरनिर्वाह करतात, म्हणूनच त्यांना परोपजीवी जंत म्हणतात. आजच्या आपल्या या भागात आपण जनावरांमध्ये आढळून येणारे जंत आणि जंतांचे प्रकार याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

उष्ण आणि दमट भागात, जनावरांचे नियमितपणे जंतनाशन करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया जंतांमुळे जनावरांच्या शरीरावर होणारे परिणाम (Effects of Worms on Animal Body):

  • जंत जनावरांसाठी घातक असतात. ते जनावरांच्या शरीरातील पाचक रस आणि रक्त शोषतात.
  • जनावर अशक्त बनते.
  • जंत झालेले जनावर रोडावते.
  • जनावराला अपचन होते किंवा हगवण लागते.
  • जंत आतड्याच्या त्वचेवर जखमा करतात. त्यामुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळून येतात.
  • जनावरांची त्वचा खडबडीत दिसते. जंत झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे ते विविध आजारांना बळी पडतात.
  • जंत लहान वासरांना अतिशय घातक असतात.
  • वासरांच्या पोटामध्ये जंत झाल्यामुळे त्यांची भूक मंदावते. वाढ नीट होत नाही, वजन घटते. त्यांच्यामध्ये अशक्तपणा येतो, त्यांना रक्तक्षम होतो. यासाठी लहान वासरांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  • जनावरांचे दूध उत्पादन घटते.
  • गाई म्हशींची प्रजनन क्षमता कमी होते.

जनावरांमध्ये आढळून येणारे जंत (Worms found in animals):

जनावरांमध्ये मुख्यतः चपटे जंत (टेप वर्म), गोल जंत (राउंड वर्म) आणि पर्णाकृती जंत (फ्ल्यूक वर्म) दिसतात.

चपटे जंत:

  • चपटे जंत चपट्या आकाराचे असतात. शरीर अनेक चपट्या फितींनी बनलेले असते.
  • चपटे जंत जठर किंवा आतड्यांमध्ये आढळतात. डोके आतड्यात खुपसून तेथील पाचक रस शोषून घेतात.
  • जंताच्या मागील भागात अंडी तयार होतात. ती जनावरांच्या शौचावाटे बाहेर पडतात आणि इतर जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात.

गोल जंत:

  • गोल जंत लहान वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. जंत आकाराने गोल असतात. अंडी जनावरांच्या शौचावाटे बाहेर टाकली जातात.
  • अंडी कुरण किंवा गवतातून इतर जनावरांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यांच्यामध्ये हे जंत विकसित होतात.
  • प्रादुर्भावामुळे वासरांना हगवण लागते, वासरू अशक्त होते आणि दगावते.

पर्णाकृती जंत:

  • पर्णाकृती जंत जनावरांच्या पित्ताशय व यकृतात सापडतात. यांचा आकार झाडांच्या पानाच्या आकाराचा असतो.
  • जंत आपली अंडी आतड्यात सोडतात. शेणाबरोबर ही अंडी शरीराबाहेर पडतात.
  • पाण्याच्या सान्निध्यात अंडी फुटतात आणि गवताच्या पात्यावर राहतात. हे गवत जनावरांच्या खाण्यात आले की जंत जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. तेथून यकृत आणि पित्ताशयामध्ये प्रवेश करतात.
  • यकृत पेशींचा नाश करून कालांतराने यकृत निकामी करतात. तिथेच जंत मोठे होतात. यामुळे जनावरांमध्ये कावीळ होते.

जंतनाशकाची निवड करताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while choosing germicide):

  • जंतनाशकाची निवड करण्यापूर्वी आपल्या जनावराला कोणत्या प्रकारच्या जंताची बाधा झाली आहे किंवा आपल्या भागात अस्तित्वात असणाऱ्या जंताचे प्रकार जाणून घेण्यासाठी जनावरांच्या शेणाची तपासणी करावी लागते.
  • जनावराच्या शेणाची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केल्यास जंताच्या अंड्यावरून आजाराचे अचूक निदान करता येते. यामुळे जंत निवारण्यासाठी उपयुक्त व प्रभावी जंतनाशक निवडणे सुलभ होते. अनेक प्रकारच्या जंतांना एकाच वेळी नियंत्रण करण्याची क्षमता असलेले जंतनाशक वापरल्यास ते उपयुक्त ठरते.

जंत प्रतिबंधात्मक उपाय (Worm prevention measures):

  • शेणाच्या नमुन्यांचे मूल्यांकन करून निरोगी कळप राखावा. मूल्यांकनावरून जंताचा प्रादुर्भाव कळतो. त्यानुसार उपाययोजना करावी.
  • जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी चांगला आहार द्यावा. जेणेकरून जनावरांना जंत संक्रमणास प्रतिरोधक बनू शकेल.
  • लहान जनावरांना जन्माच्या सहा तासांच्या आत चीक पिण्यास द्यावा. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
  • पुरेशा प्रमाणात कुरणाचे व्यवस्थापन करावे. गोठा आणि कुरणाची स्वच्छता ठेवावी. जनावरांचे वेळेवर जंतनिर्मूलन करावे.

जंतनाशकाचा वापर (Application of germicide):

  • जंतबाधा झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिफारशीनुसार वेळेवर जंतनाशके द्यावीत.
  • जंतनाशक सर्व प्रकारच्या जंतावर कार्यक्षम असावे.
  • जंतनाशकाचा जनावरांवर विपरीत परिणाम होता कामा नये.
  • एकाच जंतनाशकाचा वारंवार वापर करू नये, नाहीतर जंत त्याला प्रतिसाद देत नाही.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मात्रा द्यावी, कमी जास्त प्रमाणात देऊ नये.
  • जंतनाशक पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गोठ्यातील सर्व जनावरांना एकाच दिवशी जंतनाशक द्यावे.
  • जंतनाशक देण्याची तारीख, मात्रा, इत्यादी माहिती वहीत नोंद करावी.

जनावरांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध का निर्माण होतो?

  • जंतांच्या प्रजातीची योग्य माहिती न घेता कोणत्याही जंतनाशकाची कमी जास्त प्रमाणात मात्रा देण यामुळे प्रतिरोध निर्माण होतो.
  • जंतनाशकाची निवड करताना पशुवैद्यक तज्ज्ञांचा सल्ला न घेण.
  • वारंवार एकाच जंतनाशकाचा वापर करण.
  • जनावरांच्या विष्टेच्या नमुन्यांची तपासणी न करता जंतनाशक औषधाची मात्रा देण.

तुम्ही तुमच्या जनावरांचे जंतनिर्मूलन कसे करता? तुम्हाला कोणत्या प्रकारचे जंत निदर्शनास आले? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांमध्ये कोणते जंत आढळून येतात?

जनावरांमध्ये मुख्यतः चपटे जंत (टेप वर्म), गोल जंत (राउंड वर्म) आणि पर्णाकृती जंत (फ्ल्यूक वर्म) आढळून येतात.

2. चपटे जंत जनावरांच्या शरीरावर काय परिणाम करतात?

चपटे जंत जठर किंवा आतड्यांमध्ये आढळतात ते जनावरांच्या आतड्यात डोके खुपसून तेथील पाचक रस शोषून घेतात.

3. जनावरांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध का निर्माण होतो?

जंतांच्या प्रजातीची योग्य माहिती न घेता कोणत्याही जंतनाशकाची कमी जास्त प्रमाणात मात्रा देण यामुळे जनावरांमध्ये प्रतिरोध निर्माण होतो.

28 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ