पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
16 Nov
Follow

डिजिटल कृषी मिशन! (Digital Agriculture Mission!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

केंद्र सरकारने सुरू केलेली डिजिटल कृषी मिशन ही योजना एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात कृषी क्षेत्रामध्ये देखील डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर व्हावा या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाणार आहे. त्याबरोबरच कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, हवामानाचा अचूक अंदाज, कीटकनाशकांचा योग्य वापर पद्धती, उत्पादन वाढीसाठीचे मार्गदर्शन आदी गोष्टीची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन देशाचे उत्पन्न वाढण्यात मदत होईल. चला तर  मग आजच्या भागात जाणून घेऊया या योजनेविषयीची सविस्तर माहिती.

डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले 7 निर्णय:

  • डिजिटल कृषी मिशन साठी 2817 कोटी रुपये
  • पीक विज्ञानसाठी 3979 कोटी रुपये.
  • कृषी शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या सक्षमीकरणासाठी 2291 कोटी रुपये.
  • शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी 1702 कोटी रुपये.
  • फल उत्पादनाचा विकासासाठी 860 कोटी रुपये.
  • कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणासाठी 1202 कोटी रुपये.
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी 1115 कोटी रुपये.

डिजिटल कृषी मिशन : या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करणे, जमिनीची नोंदणी करणे, पिकाची माहिती अशी सर्व कामे ऑनलाईन केली जाणार आहेत यातून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षा : याद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकवली जाणार आहे.

कृषी शिक्षण : याद्वारे कृषी क्षेत्रात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

शाश्वत पशुधन : दूध उत्पादन वाढीसाठी आणि पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

फलोत्पादन : फळाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आणि दर्जेदार फळांचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन.

कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण : या मिशनच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन : पाणी जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधनाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.

डिजिटल कृषी मिशनचे उद्दिष्ट:

  • देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे, जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे, कृषी क्षेत्राची प्रगती, कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे. शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे, जमिनीचा कस वाढवणे, शेतीवरील होणारा खर्च कमी करून त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे.
  • शेतीमध्ये नवनवीन प्रकल्प निर्माण करणे. शेतकऱ्यांचे काम कमी करून त्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन डिजिटल पद्धतीने शेती कशी करावी याची माहिती देणे.
  • डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळात अधिकाधिक उत्पन्न कसे मिळवता येईल या संदर्भात डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे, अशा प्रकारची उद्दिष्टे या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहेत.

डिजिटल कृषी मिशनचे फायदे:

  • डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल.
  • शेतकऱ्यांना पिकाचे योग्य नियोजन करून नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे नुकसान देखील वाचवता येईल.
  • तंत्रज्ञानाच्या आधारे कमी कालावधीमध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे घ्यावे याचीही माहिती यातून मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन खूप महत्त्वाचे आहे.
  • शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन डिजिटल कृषी मिशन सुरू केले आहे, जेणेकरून देशातील शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडले जाऊन आपले उत्पादन वाढवून आर्थिक समृद्ध होऊ शकतील.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. डिजिटल कृषी मिशन योजनेचा हेतू काय?

डिजिटल कृषी मिशन या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात कृषी क्षेत्रामध्ये देखील डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक-अधिक वापर व्हावा या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे.

2. डिजिटल कृषी मिशन योजनेचे मुख्य उद्देश काय?

कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे हा डिजिटल कृषी मिशन योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3. डिजिटल कृषी मिशन या योजनेमुळे शेतकऱ्यांना काय मदत होईल?

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, हवामानाचा अचूक अंदाज, कीटकनाशकांचा योग्य वापर पद्धती, उत्पादन वाढीसाठीचे मार्गदर्शन आदी गोष्टीची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन देशाचे उत्पन्न वाढण्यात मदत होईल.

49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ