पोस्ट विवरण
झेंडू पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Diseases and management of Marigold)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
झेंडू हे संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये झेंडूची लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणुन, तसेच भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणुन झेंडूचे पीक घेता येते. तसेच कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर देखील झेंडूची शेती करता येते. मात्र झेंडू पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण झेंडू पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
झेंडू पिकात प्रामुख्याने पुढील तीन प्रकारचे रोग आढळून येतात:
1) करपा
2) भुरी रोग
3) मर रोग
4 ) मूळ कूज
करपा:
- करपा हा सुध्दा झेंडू पिकावर आढळणाऱ्या प्रमुख रोगांपैकी एक आहे.
- मर रोगाप्रमाणेच करपा हा रोग देखील बुरशी पासून होतो.
- करपा रोगाचे लक्षण झेंडू पिकाच्या खालच्या पानावर दिसून येते त्यानंतर करपा वरच्या दिशेने वाढत जातो. यामुळे पानावर काळे ठिपके दिसतात, पाने गळतात व परिणामी झेंडूचे पीक करपून मरते म्हणूनच या रोगाला करपा रोग म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- उपाययोजना म्हणून करपलेली पाने जाळावी.
- पिकाची फेरपालट करावी.
- रोगविरहित फळांचे बी वापरावे.
- जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
- रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
- रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) ४00 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- करपा रोग नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.
भुरी रोग (Powdery Mildew):
- पावडरी बुरशी हा एक बुरशीजन्य रोग आहे जो रोपाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या पावडरीच्या वाढीमुळे होतो, ज्यामुळे पाने विकृत होतात आणि प्रकाश संश्लेषण कमी होते.
- पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात.
- वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
- झेंडूवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते.
- कालांतराने हे डाग काळसर होतात आणि झेंडूचा दर्जा पूर्णपणे ढासळतो
- हा रोग देठ, खोड आणि फुलांवरही पसरतो. यामुळे रोपांची वाढ खुंटते.
- दमट हवामानात या रोगाचा प्रभाव जास्त होतो.
- भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- हेक्साकोनाजोल 5% ईसी (टाटा - कॉन्टाफ) 200 मिली/200 लीटर किंवा
- मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (Dow - systhane) 80 ग्रॅम/200 लीटर किंवा
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर किंवा
- डायफेनोकोनाझोल 25% ईसी (सिजेंटा - स्कोर) 100 मिली/200 लीटर किंवा
- टेट्राकोनाझोल 3.8% ईडबल्यु (पेप्टेक बायोसाइंसेज - PBL) 150 मिली/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.
मर रोग:
- मर हा रोग गरमी मध्ये (उष्ण वातावरणात) अथवा हवेत पाण्याचे प्रमाण (आद्रता) जास्त असल्यास वाढतो.
- मर रोग लागल्यास झेंडूची पाने पिवळी पडतात, झेंडू पिकाची मुळे सडतात.
- झेंडूची पाने पिवळी पडल्यामुळे व झेंडूची मुळे सडल्यामुळे पीक मरते म्हणूनच या रोगाला मर रोग म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- मर रोग होऊ नये म्हणून झेंडू पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकात्मिक नियोजन करावे.
- जस की झेंडू लागवड करतानाच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
- पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
- शेतात स्वछता ठेवावी.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे 0.1% बाविस्टीन (क्रिस्टल)च्या द्रावणात (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम बावीस्टीन) 10 मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवड करावी.
- झेंडू पिकात मर दिसताच कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) ४०० ग्रॅम एकर ची झेंडू पिका भोवती आळवणी करावी आणि फवारणी सुद्धा करावी.
मूळ कूज (Root Rot):
- मूळ कूज हा रोग विविध माती - जनित रोगजनकांमुळे होतो जो झेंडूच्या मुळांना संक्रमित करतो, ज्यामुळे वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि रोपांचा मृत्यू होतो.
- पाने व खोड करड्या रंगाचे होते आणि रोगग्रस्त पीक नष्ट होते.
- संक्रमित वनस्पतींची मुळे ठिसूळ आणि कोरडी होतात.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. प्रतिरोधक वाणांची लागवड करा.
- जास्त तापमानातील रोपे लागवडीसाठी टाळा.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 2.5 ग्रॅम ने प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 400 ग्रॅम किंवा
- मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी + मेटलैक्सिल 8% (टाटा - रॅलीस मास्टर) - 500 ग्रॅमने ड्रेंचिंग करावे.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या झेंडू पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1) झेंडू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
थंड हवामानात हे पीक चांगले येते व फुलांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
2) झेंडूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
झेंडू लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. जमिनीचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असावा.
3) झेंडूच्या पिकातील महत्वाचे कीटक?
झेंडूच्या पिकात लाल कोळी, केसाळ अळी व तुडतुडे हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ