पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
आम
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
2 July
Follow

आंब्याच्या नवीन रोपांना लागणारे रोग आणि व्यवस्थापन (Diseases and management of new Mango plants)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

आंबा शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी व्यवसाय असून, महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रातील आंबा शेती मुख्यत्वे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात केली जाते, जेथे हवामान आणि मातीची परिस्थिती आंब्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षांपूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. आंब्याला भारतात व परदेशातही वर्षभर मागणी असते. आंबा फळांवर उद्भवणाऱ्या रोगांमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणूनच आपण आज आंबा पिकाच्या नवीन रोपावर येणारे रोग व त्यांचे नियोजन याविषयी जाणून घेणार आहोत.

आंबा पिकाच्या नवीन रोपावरील पावडरी बुरशी (Mango Powdery Mildew) :

पावडरी बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात.

लक्षणे (Symptoms):

  • रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानांपासून होते.
  • पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
  • प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि रोपे वाळतात.
  • हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे रोपांची वाढ खुंटते.
  • रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.

उपाय (Remedy) :

  • पावडरी बुरशी रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी
  • अ‍ॅपेलोमायसेस क्विस्क्वालिस (कात्यायनी-अ‍ॅपेलोमायसेस) 1.5 लिटर प्रति 300 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा पिकात एकरी फवारणी करावी किंवा
  • मायक्लोब्यूटानिल 10% डब्ल्यू (इंडोफील-बून) 150 ग्रॅम किंवा झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू (इंडोफील-अवतार) 600 ग्रॅम प्रति 300 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी.
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट)  - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
  • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 8-10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.

आंबा पिकाच्या नवीन रोपावरील काळा करपा (Mango Anthracnose):

या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जादा आर्द्रता किंवा पावसामुळे होतो. तसेच, रोगाचा प्रसार प्रथम प्रादुर्भाव रोगग्रस्त अवशेष आणि बियाण्यांमार्फत होतो.

लक्षणे (Symptoms):

  • बहुतांश वेळा पानांवर पानथळ, लहान, पिवळसर आणि नंतर तपकिरी ठिपके पडतात.
  • रोगग्रस्त पाने करपतात.
  • पानांचे देठ आणि रोपांवर रोगाचे ठिपके पडून पाने व रोपे सुकून वाळतात.
  • आंब्याच्या पानांवर ओलसर तपकिरी - काळ्या रंगाचे ठिपके पडतात.
  • आंब्याच्या फळांवर खोलगट आणि काळ्या कडा असलेले खडबडीत ठिपके पडतात.
  • ढगाळ हवामानात या ठिपक्यांवर गुलाबी बुरशीची वाढ होते. तसेच लालसर डिंकासारखा द्रव पाझरताना दिसतो.

उपाय (Remedy):

  • पिकाची फेरपालट करावी.
  • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 600 ग्रॅम प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अँथ्रकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 450 मिलीची 300 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

आंबा पिकाच्या नवीन रोपावरील काजळीचा रोग:

हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि अनेक प्रकारच्या फळ पिकांवर परिणाम करतो.

लक्षणे:

  • काळसर बुरशी आंब्याच्या झाडांना व इतर झाडांना ज्यांना यापूर्वी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यांना लागते.
  • ही बुरशी किड्यांनी झाडांना खाताना जो मधाळ, चिकट, गोड रस सोडलेला असतो त्यावरच वाढते.
  • हळुहळु ही बुरशी झाडाच्या संक्रमित भागाला ग्रासते.
  • या बुरशीमुळे झाडाच्या प्रकाश्संस्लेषणावर आणि हवेतील वायुंच्या अदलाबदलीच्या क्षमतेवर परिणाम होतो.
  • जास्त बुरशी लागलेली पाने सुकतात आणि गळतात, त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.

उपाय:

  • नियंत्रण प्रक्रियेत कीटक आणि काजळी दोन्ही एकाच वेळी नियंत्रित करणे आवश्यक आहे.
  • रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा व निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपूर्वी थायरम किंवा व्हिटाव्हॅक्स 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.
  • रोगग्रस्त रोपे काढुन नष्ट करावीत.
  • या रोगाच्या नियंत्रणसाठी 0.1 टक्के क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी (सिजेंटा-कवच) 350 ते 500 ग्रॅम एकर किंवा प्रोपिकोनाझोल 25%ईसी (सिंजेंटा-टिल्ट) 300 मिली प्रति 300 लिटर ड्रेंचिंग करावी.

आंबा पिकाच्या नवीन रोपावरील लाल कुज (Red Rot) :

लाल कुज हा रोग मातीमध्ये असलेल्या कॉलिटॉट्रिकम फॅलकॅटम या बुरशीमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऊसावर आणि पानांवर दिसून येतो.

लक्षणे:

  • लागण झालेल्या पानांचा रंग बदलतो.
  • हिरवा ते नारिंगीनंतर नारिंगी ते पिवळा असा होतो.
  • लाल रंगाचे ठिपके पानाच्या मध्य शिरेवर दिसतात.
  • पाने खालून वर सुकत जातात.

उपाय:

  • लागवडीपुर्वी बेणे 1 टक्का बोर्डोमिश्रणच्या द्रावणात बुडवावेत.
  • रोग आढळून आल्यास पाने एकत्रित करून जाळून नष्ट करावीत.
  • बियाणे कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (क्रिस्टल-बाविस्टीन) च्या द्रावणात 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी 15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर त्याची लागवड करावी.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्ट-बाविस्टिन) - 8 ग्रॅम किंवा
  • मॅन्कोझेब  75 % डब्ल्यूपी (देहात DEM 45)- 18 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करा.

आंबा पिकाच्या नवीन रोपावरील करपा:

हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग पायरीक्युलॅरीया ओरायझो या बुरशीमुळे होतो.

लक्षणे:

  • सुरुवातीला पानाच्या टोकावर लक्षणे दिसतात. परंतु कधी-कधी पानांच्या कडेवर किंवा मध्यभागी पृष्ठभागावर पण दिसतात.
  • या रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पानाच्या रोगग्रस्त भागावर गोल लंबाकार अर्धपारदर्शक ठिपके दिसून येतात.
  • जसे-जसे रोगाची तीव्रता वाढत जाईल तस-तसे ठिपक्याचे प्रमाण वाढून पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात.
  • ठिपक्याची कडा गर्द तपकिरी असून हे ठिपके एकमेकात मिसळून पाने पुर्णपणे करपतात.
  • पाने करपल्याने पिकाची वाढ थांबते पाने करपल्याने अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते व त्यामुळे उत्पादनात घट होते.
  • या रोगाची प्राथमिक सुरुवात रोगग्रस्त बियाण्यापासून होते.
  • दुय्यम स्वरुपाचा प्रसार हवेमार्फत व रिमझिम पडणाऱ्या पाऊसामुळे होतो.

नियंत्रण:

  • या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. भाताच्या बिजप्रक्रियेसाठी 300 ग्रॅम मीठ + 1 लिटर पाण्यात मिसळून (30% मिठाचे द्रावण) त्यात भात बियाणे टाकून तरंगणारे बियाणे काढून टाकावे व तळाला राहिलेले बियाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व सावलीत सुकवावे. नंतर 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी..
  • अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
  • रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा- जया, फुले मावळ, इंद्रायणी व फुले राधा
  • या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब 75% डब्ल्यूजी (देहात:DEM-45) 3 ग्रॅम किंवा
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (इफको-यामाटो) 1 ग्रॅम किंवा
  • हेक्झाकोनॅझोल 5% इसी (टाटारॅलिस-कॉन्टाफ) 1 मिलि किंवा
  • क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 2.5 ग्रॅम किंवा
  • 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या आंबा पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. आंबा झाडाला लागणारे प्रमुख कीटक कोणते?

आंबा झाडाला लागणारे तुडतुडे, पिठ्या ढेकूण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा, कोळी, मिजमाशी अशे 10 ते 12 प्रमुख कीटक आहेत.

2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?

आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.

3. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी सर्वात जास्त हानिकारक रोग कोणता?

पावडरी बुरशी म्हणजेच भुरी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.

48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ