पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
21 Mar
Follow

करडातील रोग व उपाययोजना (Diseases and remedies in Goats)

नमस्कार पशुपालकांनो,

शेळीच्या छोट्या पिल्लांची म्हणजेच करडांची जास्तीत जास्त वजन वाढ कमी काळात करून त्यांना प्रजनन योग्य शेळी बनवणे हे शेळी पालन व्यवसायात अत्यंत महत्वाचे असते. अश्या बोकडांची आणि शेळ्यांची विक्री करूनच आपल्याला शेळीपालनामधून अधिक नफा मिळविता येतो म्हणजेच शेळीपालनाचे अर्थकारण हे करडांवर अवलंबून असते. पण नेमकं लहान वयातच ही करडे अनेक आजारांना देखील बळी पडतात म्हणूनच आजच्या या लेखात आपण करडांना होणारे रोग व त्यावरील उपाययोजनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

करडातील रोग व उपाययोजना | Diseases and remedies in Goats

1) अचानक मरतुककारण

कारण:

  • जीवाणू
  • विषाणू
  • परोपजीवी

लक्षणे:

  • काही वेळा कोणतीही लक्षणे न दिसता मरतुक.
  • पातळ संडास.
  • शांत उभे राहणे.
  • अशक्तपणा.

प्रतिबंधक उपाय:

  • सुधारित आरोग्य, व्यवस्थापन व चांगली निगा.
  • शेळीला गर्भावस्थेत सकस आहार.
  • करडू शेळीद्वारे पित नसेल तर बाटलीद्वारे दुध/चीक पाजणे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.

2) नाळेचा आजार (नेव्हल इल):

कारण:

जीवाणू

लक्षणे:

  • ताप येणे.
  • नाळेच्या जागी सूज येणे.
  • भूक न लागणे.
  • खाण्याची इच्छा न होणे.
  • माशा आसाडी घालून आळ्या पडतात व हर्निया होतो आणि पिल्लू मरते.

प्रतिबंधक उपाय:

सुधारित आरोग्य व व्यवस्थापन आणि चांगली निघा.

3) कुपोषित

कारण:

  • चिकापासून वंचित राहणे.
  • दुध कमी मिळणे.

लक्षणे:

  • तोंड कोरडे पडणे.
  • अशक्तपणा.
  • ताप किंवा पिल्लू थंड पडणे.
  • पोट खोल जाणे.

प्रतिबंधक उपाय:

  • गर्भावस्थेत सकस आहार तसेच आजारी असल्यास वेळेवर उपचार करणे.
  • थंडी पडल्यावर गोठ्याच्या मोकळ्या बाजूने पोती लावणे.
  • कँल्शियम पाजणे.
  • करडास उबदार जागी ठेवणे.
  • गोठ्यात बल्ब लावणे.
  • एखाद्या शेळीस जास्त चीक असल्यास तो गोठवून ठेवणे व करडांना गरजेप्रमाणे कोमट करुन पाजणे.
  • एकदा पातळ केलेला चीक परत वापरू नये.

4) गुदमरणे

कारण:

विण्याच्या क्रियेशी संबंधित.

लक्षणे:

  • तडफडणे.
  • कोणतेही लक्षण न दाखवता मरतूक.
  • श्वास न घेणे किंवा मेलेले करडू बाहेर येणे.

प्रतिबंधक उपाय:

  • शेळी विताना अडल्यास मदत करणे.
  • पिल्लू वेडेवाकडे असल्यास सरळ करून मगच बाहेर ओढणे.
  • विण्याच्या जागी गर्दी कमी करणे.
  • पशुवैद्यकाची मदत घेणे.

5) काँक्सिडि-ओसिस

कारण:

काँक्सिडिया परोपजीव.

लक्षणे:

  • पाठीची कमान करून उभे राहणे.
  • घाण वास येणारा पातळ संडास.
  • कधी कधी रक्तमिश्रित संडास होणे.
  • अस्थिरपंजर होणे.

प्रतिबंधक उपाय:

  • चांगली निगा सुधारित व्यवस्थापन व आजारी करडे वेगळी काढणे.
  • लेंडी तपासून निदान करणे योग्य उपचार करणे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषध उपचार.

6) न्युमोनिया

कारण:

  • जिवाणू
  • विषाणू
  • बुरशी

लक्षणे:

  • सर्दी
  • खोकला
  • ताप
  • डोळ्यातून पाणी

प्रतिबंधक उपाय:

  • स्वच्छ व कोरडा गोठा.
  • पुरेशी खेळती हवा.
  • गोठ्यातील मलमूत्र, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.

7) हगवण कोलाय-बँसिलोसिस

कारण:

जिवाणू

लक्षणे:

  • पातळ संडास.
  • भूक न लागणे.
  • ताप.

प्रतिबंधक उपाय:

  • आजारी करडांना वेगळे करून उपचार करणे.
  • सुधारित आरोग्य व व्यवस्थापन.
  • करडांसाठी सहज उपलब्ध होईल असे पिण्यासाठी स्वच्छ पाणी.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.

8) गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव

कारण:

परोपजीवी.

लक्षणे:

  • खाजवणे.
  • पंडुरोग.
  • केस जाणे.
  • अशक्तपणा.
  • अंगावर पिसवा व गोचिड दिसतात.
  • खरुज दिसते.

प्रतिबंधक उपाय:

  • करडांना समप्रमाणात राख व 50 टक्के कार्बारिल पावडर मिसळून अंगावर चोळणे.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली ब्युटाँक्स किंवा मेगासाईड औषध टाकून शेळ्या व करडांना अंघोळ घालावी.
  • शेळ्या परत गोठ्यात सोडण्यापूर्वी, गोठ्यातील जमीन जाळून टाकावी.
  • कीटकनाशकांचा वापर अतिशय सावधपणे करावा व चाटून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी झाल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधावा.
  • टीप: वरील सर्व उपचार पशु वैद्यकांच्या सल्ल्यानुसार करावेत.

9) पोटसूळ

कारण:

  • जास्त दूध
  • जिवाणू
  • विषाणू

लक्षणे:

  • कण्हणे.
  • पाठीची कमान होणे.
  • सारखे सारखे संडास आल्यासारखे करणे व ओरडणे.
  • पोटामध्ये संडासाच्या गुठळी तयार होणे.

प्रतिबंधक उपाय:

ग्राईप वॉटर एक चमचा दिवसातून तीन वेळा.

करडांचा गोठा कसा असावा?

1) शास्त्रीय दृष्टिकोनातून गोठा बांधल्यास जास्तीत जास्त शेळ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते, त्यासाठी शेळ्या, बोकड व करडांसाठी योग्य क्षेत्रफळाची, निवाऱ्याची जागा ठरवून गोठा बांधणी केल्यास व्यवस्थापन चांगले होते.

2) गोठ्याला सिमेंट किंवा लोखंडी पत्रे, तसेच पालापाचोळ्यापासून अथवा ऊसाच्या पाचटापासून केलेले उतरते छतही चांगले असते; पण हे छत पावसाळ्यात गळता कामा नये. या छताचा एक फायदा म्हणजे उन्हाळ्यात हे छत थंड राहते.

3) शेळ्यांच्या गोठ्यातील जमिनीसाठी शहाबादी फरशी किंवा मुरूमही चालू शकतो; पण शक्‍यतोवर जमीन थंड व खडबडीत असू नये. यापेक्षा मुरूम टाकून धुमस केलेली व त्यानुसार मूग, साळ व गहू यांचा भुसा, चुना व शेणमातीत मिसळून पातळ थर दिलेली जमीन सोईस्कर ठरते. ठराविक काळानंतर वरचा थर काढून दुसरा थर द्यावा लागतो.

4) गोठ्याच्या बाहेर मोकळे फिरण्यास काही जागा असावी. ही सर्व जागा तारेच्या कुंपणाने बंदिस्त करून घ्यावी. ही मोकळी जागा थोड्याफार प्रमाणात कमी- अधिक ठेवता येते.

5) गोठ्यामध्ये मादी व नर व वेगवेगळ्या गटांतील करडांसाठी वेगवेगळे कप्पे करावे. आजारी करडे, प्रसूत होणाऱ्या शेळ्या यांच्यासाठीसुद्धा स्वतंत्र कप्पे असणे आवश्‍यक आहे. गोठ्यात शेळीसाठी 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. पाण्याचा हौद दर आठवड्याला स्वच्छ करून त्याला चुना लावावा, म्हणजे हौदात शेवाळ होणार नाही.

तुमच्या करडांमध्ये कोणत्या प्रकारचे रोग आढळून येत आहेत? आणि तुम्ही काय उपाययोजना करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. शेळी पालन व्यवसायात अत्यंत म्हत्वाची गोष्ट कोणती?

शेळीच्या छोट्या पिल्लांची म्हणजेच करडांची जास्तीत जास्त वजन वाढ कमी काळात करून त्यांना प्रजनन योग्य शेळी बनवणे हे शेळी पालन व्यवसायात अत्यंत महत्वाचे असते.

2. शेळीपालनाचे अर्थकरण कशावर अवलंबून असते?

शेळीपालनाचे अर्थकारण हे करडांवर अवलंबून असते.

3. करडांना नाळेचा आजार कशामुळे होतो?

करडांना नाळेचा आजार जिवाणूंमुळे होतो.

36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ