पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
अनार
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
14 Mar
Follow

डाळिंब पिकातील रोग आणि त्यांचे व्यवस्थापन! (Diseases and their management in Pomegranate crop!)


नमस्कार शेतकरी बंधुंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

डाळिंब हे भारतातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे. डाळिंबाच्या लागवडीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतात, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू राजस्थान ही प्रमुख डाळिंब उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्‍यापूर्वी सन 1989-90 मध्‍ये डाळिंब पिकाखाली 7700 हेक्‍टर क्षेत्र होते. डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यात प्रामुख्‍याने होत असून इतर जिल्ह्यातही मोठया प्रमाणावर होत आहे. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. अवर्षण प्रवण भागामध्‍ये हलक्‍या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड असल्यामुळे या पिकाच्‍या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. डाळिंब पिकात हवामानानुसार अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन, अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव डाळिंब बागेत वाढत जातो. आजच्या आपल्या या लेखात आपण याच रोगांच्या नियंत्रण व व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

डाळिंब पिकात आढळून येणारे रोग:

  • तेल्या रोग
  • सर्कोस्पोरा (डांबरी) रोग
  • मर रोग
  • अँथ्रॅकनोज रोग

डाळिंब पिकातील तेल्या रोग:

डाळिंब पिकातील तेल्या रोगाची लक्षणे (Symptoms of Oily Spot disease in Pomegranate crop):

  • प्रथमावस्थेत रोगाचे डाग हे तेलकट, अनियमित, लंबगोलाकार तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले आढळून येतात.
  • फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात.
  • फळावर डाग पडल्यामुळे त्यांची प्रत पुर्णपणे खराब होते परिणामी फळांना बाजारभाव मिळत नाही.
  • उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने ज्विळी पडून गळून पडतात.
  • खोडावर पडणारा डाग खोलवर गेल्यास खाच तयार होते आणि तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात.
  • रोगामुळे 30 ते 50% नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 80 ते 100% नुकसान होऊ शकते.

डाळिंब पिकातील तेल्या रोग व्यवस्थापन (Management of Oily Spot disease in Pomegranate crop):

  • जिथे या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो अशा भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा.
  • बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
  • बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • प्रत्येक झाडास तीन ते चार खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत.
  • सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापुर्वी लावावा.
  • तसेच छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 500 ग्रॅम + 20 मिली स्टिकर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • छाटणीची व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1.5 % सोडियम हायपोक्लोराईड च्या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच या अवजारांचा वापर करावा.
  • रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
  • प्रतिबंधात्मक फवारणीसाठी जैविक स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स 3 मिली किंवा तेल्या किल 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (धानुका-धानुकॉप) हे तांब्रयुक्त ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. हे बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांचे त्याच्या स्पर्शजन्य कृतीद्वारे नियंत्रण करते. या बुरशीनाशकाची 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पुढील 4 फवारण्या प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 5-6 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात:
  • पहिली फवारणी -

कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (धानुका-धानुकॉप) 400 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 30 ग्रॅम + स्टिकर 200 मिलि

  • दुसरी फवारणी -

कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टीन) 200 ग्रॅम + कासुगामाइसिन 400 मिली  + स्टिकर  200 मिलि

  • तिसरी फवारणी -

कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (धानुका-धानुकॉप) 500 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 30 ग्रॅम + स्टिकर 200 मिलि

  • चैाथी फवारणी -

मँकोझेब 75% डब्ल्यू पी (देहात-DEM45) 400 ग्रॅम +  कासुगामाइसिन 400 मिली + स्टिकर 200 मिलि

  • सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापुर्वी बंद करावी.
  • पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसापुर्वी बंद करावी.
  • फवारणी करताना पंप किंवा टँक मध्ये स्टिकर आवश्य मिसळावे.

डाळिंब पिकातील सर्कोस्पोरा (डांबरी) रोग:

डाळिंब पिकातील सर्कोस्पोरा (डांबरी) रोगाची लक्षणे (Symptoms of Cercospora Disease in Pomegranate Crop):

  • लक्षणे प्रथम फुलांच्या दलात दिसतात. अतिसूक्ष्म, गोलाकार आणि तपकिरी ते काळे डाग येतात. हे डाग नंतर मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि गडद होतात. आकार बेढब होतो आणि धब्बे 1-12 मि.मी. व्यास आकाराचे होऊ शकतात.
  • फळांवर डाग जीवाणूजन्य करप्याच्या व्रणांसारखे दिसतात पण ते गडद काळे, वेगळे, विविध आकारांचे, चिरा नसलेले आणि चिकट नसलेले असतात.
  • पानांवर डाग फैलावलेल्या पिवळ्या कडांचे, विखुरलेले, गोलाकार किंवा बेढब, गडद लालसर तपकिरी ते अगदी काळ्यासारखे असतात. हे डाग 0.5 ते 5 मि.मी. व्यासाचे असतात आणि एकमेकात मिसळत नाहीत.
  • डाग असलेली पाने फिकट हिरवी होतात, नंतर पिवळी होतात आणि गळतात.
  • काळे लंबगोलाकार डाग काटक्यांवर येतात. संक्रमित काटकी सुकते आणि मरते.
  • इष्टतम तापमान 25-32 डिग्री सेल्सियस सोबत रात्रीचे तापमान 16 डिग्री सेल्सिअस आणि 90-95% पर्यंत सापेक्ष आर्द्रता ही रोगाच्या विकासासाठी अनुकूल अस्ते.

डाळिंब पिकातील सर्कोस्पोरा (डांबरी) रोगाचे व्यवस्थापन (Management of Cercospora Disease in Pomegranate Crop):

  • रोगग्रस्त फळे व फांद्या काढून नष्ट कराव्यात.
  • कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोजेब 63% डब्ल्यू पी (देहात-साबू) 500 ग्रॅमची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • प्रोपिकोनाझोल 25% ईसी (सिजेंटा-टिल्ट) 200 मिलीची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • प्रोपिकोनाझोल 13.9% + डिफेन्कोनाझोल 13.9% ईसी (GSP-Vespa) 100 मिलीची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • टेबुकोनाझोल 250% ईसी (बायर-फॉलीक्युअर) 400 मिलीची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यूपी (टाटा-ताकत) 400 ग्रॅमची  200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
  • मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु पी (देहात-Xotic Gold) 500 ग्रॅमची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब पिकातील मर रोग:

डाळिंब पिकातील मर रोगाची लक्षणे (Symptoms of Wilt disease in Pomegranate crop):

  • अचानक झाडाचा शेंड्याकडील भाग पिवळा पडण्यास सुरुवात होऊन कालांतराने संपूर्ण झाड पिवळे पडून वाळून जाते.
  • लागण झालेल्या फांदीवर फळे असल्यास फळेसुद्धा वाळून जातात परंतु न गळता तशीच झाडाला लटकलेली राहतात.
  • रोगग्रस्त मुळे किंवा खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी किंवा काळसर झालेला दिसतो.

डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन (Management of Wilt Disease in Pomegranate Crop):

  • प्रोपिकोनाझोल 25% ईसी (अदामा-बंपर) 2 मिली + क्लोरोपायरीफॉस 20% ई.सी. (देहात-दिवार/टाटा-तफाबान) 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून हे पाणी प्रति 5 ते 10 लिटर प्रमाणात प्रत्येक झाडाभोवती आळवणी किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून द्यायचे आहे. अश्या आपल्याला 20 दिवसाच्या अंतराने 3 वेळा आळवण्या करायच्या आहेत किंवा
  • फॉसेटिल एआय 80% डब्ल्यूपी (बायर-एलिएट) 6 ग्रॅम प्रति झाड देऊन झाल्यावर 20 दिवसांनी टेबुकोनाझोल 250 ईसी (बायर-फॉलिक्युर) 3 मिली प्रति झाड बुडाजवळ 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणीच्या माध्यमातून द्यायचे.

डाळिंब पिकातील अँथ्रॅकनोज रोग:

डाळिंब पिकातील अँथ्रॅकनोज रोगाची लक्षणे (Symptoms of Anthracnose disease in Pomegranate crop):

  • पानांवर व फळांवर लहान आकाराचे नियमित ते अनियमित काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात जे नंतर गर्द तपकिरी रंगामध्ये परावर्तित होतात.
  • रोगग्रस्त पाने पिवळी होऊन गळून जातात.

डाळिंब पिकातील अँथ्रॅकनोज रोगाचे व्यवस्थापन (Management of Anthracnose Disease in Pomegranate Crop):

  • हस्त किंवा आंबे बहार निवडावा.
  • झाडातील अंतर विस्तृत असावे आणि झाडाची वार्षिक छाटणी करावी.
  • रोगग्रस्त पाने, डहाळे आणि फळांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
  • 3.3% मेटॅलॅक्सिल - एम 33.1% क्लोरोथॅलोनिल (सिजेंटा-फोलीओ गोल्ड) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापन कसे करता? तुम्हाला या रोगांची काय लक्षणे तुमच्या पिकात दिसून आली? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. डाळिंब पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

डाळींब पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.

2. डाळिंबाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेता येते.

3. डाळिंब पिकात कोणती आंतरपिके घेता येतात?

डाळिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्‍ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबिन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्‍हणून घेता येतात.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ