पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
मक्का
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
18 Mar
Follow

मका पिकात आढळून येणारे रोग आणि व्यवस्थापन! (Diseases in Maize crop and their management)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मका, हे जगातील सर्वात महत्वाच्या पिकांपैकी एक आहे. मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच हे पीक भारतासोबतच महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मका हे उबदार हंगामातील पीक आहे. त्याला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. मका पिकाचे 30 ते 40 टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग. मका पिकावर येणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण मका पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

मका पिकावर आढळून येणारे रोग (Diseases found in Maize crop):

  • करपा
  • केवडा
  • तांबेरा
  • काळी कुज
  • अँथ्रॅक्नोज

मका पिकातील करपा रोग (Blight Disease in Maize crop):

मका पिकातील करपा रोगाची लक्षणे (Symptoms of Blight disease):

  • सुरुवातीला पानावर लांबट, पाणी भरल्यासारखे ठिपके दिसतात.
  • परिपक्व लक्षणे म्हणजे सिगारच्या आकाराचे 3 ते 15 सेमी लांबीचे चट्टे.
  • चट्टे लंबगोलाकार, तपकिरी रंगांचे असतात आणि त्यावर ठळक भाग दिसतात.
  • सामान्यपणे चट्टे आधी पानाच्या खालच्या भागावर दिसतात, मग पीक परिपक्व होईल तसे पानाच्या वरच्या भागापर्यंत आणि कणसाच्या आवरणापर्यंत पसरतात.
  • गंभीर प्रादुर्भाव झाला असेल तर चट्टे एकत्र येतात, त्यामुळे संपूर्ण पानांवर करपा येतो.

मका पिकातील करपा रोग नियंत्रणाचे उपाय (Management of Blight disease):

  • प्रभावित झाडे काढा. प्रतिरोधक मका वाणांचा वापर करावा.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यू.पी. (देहात-डेम45) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यू.पी. (धानुका-धानूकोप) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • स्यूडोमोनास फ्लोरेसेंस (आईएफसी-फ्लुरो शील्ड) 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

मका पिकातील केवडा रोग (Downy Mildew Disease in Maize crop):

मका पिकातील केवडा रोगाची लक्षणे (Symptoms of Downy Mildew disease):

  • नवीन रोपे या रोगास जास्त बळी पडतात.
  • पानांवर रंगहीन पट्टे दिसतात आणि पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर पांढरी पावडरसारखी वाढ दिसून येते.
  • प्रादुर्भावग्रस्त रोपांची वाढ खुंटते आणि पेर लहान झाल्यामुळे ती झुडपाप्रमाणे दिसतात.
  • कधीकधी झुपक्यात पानांची वाढ दिसते आणि कणीस तयार होत नाही.

मका पिकातील केवडा रोग नियंत्रणाचे उपाय (Management of Downy Mildew disease):

  • रोगग्रस्त झाडे काढा. प्रतिरोधक मका वाण लावा.
  • कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू.पी (देहात-साबू) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु.पी (देहात-Xotic Gold) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • ट्राइकोडर्मा विरिडी (आईएफसी-ट्राइको शील्ड) 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

मका पिकातील तांबेरा रोग (Rust Disease in Maize crop):

मका पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे (Symptoms of Rust disease):

  • पानाच्या दोन्ही पृष्ठभागांवर तपकीरी धुळीसारखे फोड दिसतात.
  • नंतर पाने पिवळी पडतात आणि वाळतात.
  • थंड तापमान आणि जास्त सापेक्ष आद्रता या रोगास अनुकुल असते.

मका पिकातील तांबेरा रोग नियंत्रणाचे उपाय (Management of Rust disease):

  • पर्यायी वनस्पती नष्ट करा.
  • ट्राइकोडर्मा विरिडी 1 किलो / एकर + 20 किलो चांगले विघटित शेणखत (वापर करण्यापूर्वी 10 दिवस आधी मिसळा) पेरणीनंतर 30 दिवसांनी जमिनीत पसरावा.
  • हेक्साकोनाझोल 4% + झिनेब 68% (इंडोफील-अवतार) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू.पी (देहात-साबू) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • ट्राइकोडर्मा विरिडी (आईएफसी-ट्राइको शील्ड) 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

मका पिकातील काळी कुज रोग (Black Rot Disease in Maize crop):

मका पिकातील काळी कुज रोगाची लक्षणे (Symptoms of Black Rot disease):

  • मका लागवड करणाऱ्या विषुववृत्तीय आणि उपविषुववृत्तीय देशांमध्ये हा रोग जास्त दिसतो.
  • परिपक्वतेच्या काळात हा रोग ठळकपणे दिसून येतो.
  • रोपावस्थेत वाढ खुंटते आणि फुले किंवा कणीस येत नाहीत.
  • जुन्या रोपांवर संक्रमण झाले असता कणसात गाठीयुक्त काळ्या काणीने भरलेली बिजाणुफळे येतात.
  • जशी ती फुटतात त्यात काळी भुकटीसारखी सामग्री आढळते.
  • पानांवरील गाठी सामान्यपणे लहान असतात आणि न फुटता सुकुन जातात.

मका पिकातील काळी कुज रोग नियंत्रणाचे उपाय (Management of Black Rot disease):

  • एक दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे
  • पिक फेरपालट करा.
  • फुलांच्या वेळी पाण्याची कमतरता टाळल्यास रोग कमी होतात.
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यू.पी. (धानुका-धानूकोप) 500 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी ड्रेंचिंग करावी किंवा
  • मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु.पी (देहात-Xotic Gold) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी ड्रेंचिंग करावी किंवा
  • स्यूडोमोनास फ्लोरेसेंस (आईएफसी-फ्लुरो शील्ड) 500 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी ड्रेंचिंग करावी.

मका पिकातील अँथ्रॅक्नोज रोग (Anthracnose Disease in Maize crop):

मका पिकातील अँथ्रॅक्नोज रोगाची लक्षणे (Symptoms of Anthracnose disease):

  • पानांवर लहान गोलसर ते लांबट 15 मिमीपर्यंत पाणीदार ठिपके दिसून येतात.
  • ते ठिपके एकमेकांसोबत मिळून मोठे होतात.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळतात व परिणामी झाड सुकते.
  • या रोगामुळे पीक उत्पादनात 30% पर्यंत घट येते.

मका पिकातील अँथ्रॅक्नोज रोग नियंत्रणाचे उपाय (Management of Anthracnose disease):

  • स्यूडोमोनास फ्लोरेसेंस (आईएफसी-फ्लुरो शील्ड) 500 मिलीची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू.पी (देहात-साबू) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु.पी (देहात-Xotic Gold) 400 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • ट्राइकोडर्मा विरिडी (आईएफसी-ट्राइको शील्ड) 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही मका पिकातील रोगांचे व्यवस्थापन कसे करता? आणि तुमच्या मका पिकात कोणते रोग दिसून आले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मका हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

मका हे उबदार हंगामातील पीक आहे.

2. मका पिकाला किमान किती दिवसांचा कालावधी लागतो?

मका पिकाला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

3. मका पिकात कोणते तण आढळून येतात?

मक्याच्या पिकामध्ये प्रामुख्याने अरुंद पाने असलेले तण व रुंद पाने असलेले तण आढळून येतात.

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ