पोस्ट विवरण
सुने
सहजन
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
3 May
Follow

शेवगा लागवड संपूर्ण माहिती (Drumstick cultivation information)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिने भारत, श्रीलंका, केनिया या तीनच देशांत केली जाते. शेवग्याची लागवड हि प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. शेवगा झाडांची विशेषतः घराभोवती किंवा शेताच्या बांधावर घरगुती वापरासाठी लागवड केली जाते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया शेवगा लागवडीविषयीची संपूर्ण माहिती.

हवामान (Weather) :

 • शेवगा पिकाची लागवड जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, यावेळी हवेतील आर्द्रता (Humidity) वाढते या कालखंडात उन्हाची तीव्रता देखील कमी असते.
 • शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते.
 • उत्तम वाढीसाठी समशीतोष्ण, उष्ण अशा दोन्ही हवामानात शेवगा लागवड केलेली चांगली ठरते.
 • या पिकास जास्त तापमान आणि अति कमी तापमान सहन होत नाही.
 • सर्वसाधारणपणे 25 ते 35 अंश सेल्सियस तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
 • कमी पाण्यात येणारे हे पिक पाणी मिळाल्यास फुलोऱ्यात येण्यास उत्सुक असते.
 • तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते.
 • रात्रीचे तापमान 16 अंश सेल्सियसपेक्षा कमी झाल्यास फळ धारणा होत नाही. तसेत ढगाळ हवामान, धुके, अति पाऊस या पिकाच्या वाढीस बाधक ठरते.

जमीन (Soil) :

 • कोरडवाहू ( Drought) जमीन शेवगा लागवडीसाठी एक प्रकारचे वरदान ठरते.
 • शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या हलक्या जमिनीतही उपयुक्त ठरते.
 • शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीत फायदेशीर ठरते.
 • पाणी धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही.
 • मात्र निचरा न होणाऱ्या भारी काळ्या जमीनीत शेवगा लागवड करू नये.
 • अशा जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात, झाडे मरतात.
 • चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये.
 • जमिनीचा सामू 5 ते 6.5 असावा.
 • जमीन भुसभुसीत, सेंद्रिय पदार्थयुक्त अशी असावी.
 • ज्या जमीनीत क्लेचे प्रमाण जास्त आहे अशा जमीनीत लागवड शक्यतो करू नये.
 • शेवगा पिक कोणत्याही जमिनी उत्तम येते म्हणजेच हलक्या प्रतीची जमीन असेल तरीही चालू शकते.
 • तसेच इतर पिकांच्या तुलनेत शेवगा लागवड करण्यासाठी कमी पाणी आवश्यक असते.

सुधारित वाण :

 • जाफना
 • रोहित- १
 • कोइमतूर- १,
 • कोइमतूर -२,
 • पी.के.एम.- १
 • पी. के. एम.-२
 • कोकण रुचिरा
 • भाग्या
 • डेक्कन ओडिसी
 • पीकेव्ही -४

शेवगा लागवड:

 • कोरड्या किंवा कमी पावसाच्या प्रदेशात शेवग्याच्या लागवडीचा हंगाम जून ते जुलै असतो.
 • कोकणासारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पिकाची लागवड करणे चांगले.
 • व्यावसायिक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मे किंवा जूनमध्ये 2 × 2 × 2 फूट आकाराचे खड्डे खणावेत.
 • त्यानंतर एक ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम निंबोळी खत आणि 10 ग्रॅम दाणेदार कीटकनाशक जमिनीत मिसळून खड्डा भरावा.
 • हलक्या जमिनीत दोन झाडांमधील आणि ओळींमधील अंतर 8 फुट X 8 फुट  (640 झाडे प्रति एकर ) आणि मध्यम जमिनीत 9.5 फुट X 9.5 फुट (प्रति एकर 444 झाडे) असावे.
 • कमी पावसाच्या प्रदेशात बियाण्यांपासून रोपांची लागवड जून आणि जुलै महिन्यात करावी.
 • शेवग्याच्या बिया उपलब्ध झाल्यानंतर टोकन करताना बिया खराब होणार नाहीत याची काळजी घेऊन प्लास्टिकच्या पिशवीत लावावी.
 • रोपाला पाणी दिले पाहिजे आणि बिया पिशवीत ठेवल्यापासून एक महिन्याच्या आत पेरल्या पाहिजेत.
 • शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून रोपे तयार करून केली जाते. परंतु, बियांपासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळत नाहीत.
 • फाटे कलमांच्या तुलनेत बिया लागवडीपासून तयार केलेल्या झाडांना 3 ते 4 महिने उशिरा शेंगा लागतात.
 • फाटे कलमापासून लागवडीसाठी 5 ते 6 सेंमी जाडीच्या सुमारे 1 ते 1.25 मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.

लागवडीनंतर घ्यावयाची काळजी:

 • शेवगा लागवडीनंतर आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणी या बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शेवगा लागवडीत विशेष आंतरमशागत करावी लागत नाही. मात्र, झाडांची आळी वेळोवेळी खुरपून तण काढून स्वच्छ करावीत.
 • दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते.
 • दरवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरवातीस 10 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र (165 ग्रॅम युरिया), 50 ग्रॅम स्फुरद (312 ग्रॅम सुपर फॉस्फेट) व 75 ग्रॅम पालाश (120 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणे रासायनिक खतमात्रा द्यावी.

पाणी व्यवस्थापन:

 • साधारणतः महिन्यातुन एकदा पाणी दिले तरी हे पिक उत्पादन देण्यास सक्षम आहे.
 • शेवगा हे तसे कमी पाण्यात येणारे पिक आहे.
 • पिकास 10 ते 15 दिवसांतुन एकदा पाणी दिले तरी पुरेसे होते.
 • ड्रिप इरिगेशन असेल तर उन्हाळाच्या काळात 8 ते 10 लि. पाणी प्रती दिवस ( 2 लि. क्षमतेचे ड्रिपर 4 तास) आणि इतर काळात त्याच्या निम्मे म्हणजेच 4 ते 5 लि. पाणी प्रती दिवस (2 लि. क्षमतेचे ड्रिपर 2 तास) दिल्यास पिकापासुन चांगले उत्पादन मिळते.

शेवगा पिकातील किडी व रोग:

 • केसाळ अळी
 • बड वर्म
 • डॅपिंग ऑफ
 • फांदीवरील डॅपिंग ऑफ

छाटणी:

 • शेवगा पिकाची 2.5 x 2.5 मीटरवर लागवड केल्यास एकरी ६४० रोप बसतात.
 • लागवड करण्यापुर्वी 45 x 45 x 45 से.मी. आकाराचे खड्डे घेवुन त्यात शेणखत, गांडुळ खत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकुन त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.
 • शेवगा लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास जास्त प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढविण्यात मदत मिळते.
 • 60 ते 75 दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत.
 • एका रोपास 6 ते 10 फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते.
 • शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची 4 फूट झाल्यानंतर 3 फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईल.
 • येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते.
 • जून - जुलै मध्ये लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारीपासून मे पर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते.
 • मे मध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी.
 • छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार शेवगा लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेवगा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. शेवगा लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

शेवगा पिकाच्या लागवडीसाठी जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, यावेळी हवेतील आर्द्रता (Humidity) वाढते या कालखंडात उन्हाची तीव्रता देखील कमी असते.

2. शेवगा लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?

कोरडवाहू ( Drought) जमीन शेवगा लागवडीसाठी एक प्रकारचे वरदान ठरते.

3. शेवगा लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?

शेवगा लागवडीसाठी जमिनीचा सामू 5 ते 6.5 असावा.

26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ