दुभत्या म्हशींची काळजी
नमस्कार पशुपालकांनो,
म्हैस हा काटक, सस्तन प्राणी आहे. म्हशीच्या दूध उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक येतो. भारताशिवाय आशियाच्या इतर देशांमध्येही म्हशीपासून दूध तयार केले जाते. सिंधू सभ्यतेपासून गेल्या 5000 वर्षांपासून भारतात म्हैशींचे पशुपालन सुरु आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी म्हैस पालन व्यवसाय करतात. पूर्वी म्हैस फक्त आशियातील देशांमध्ये पाळली जात होती पण आता ती पूर्व युरोप आणि अमेरिकेतही पाळली जात आहे. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाळ गायींबरोबरच दुभत्या म्हशींचाही मोलाचा वाटा आहे. म्हशींचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन योग्य ठेवले तर त्या कमी आजारी पडतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण दुभत्या म्हशींच्या घ्यावयाच्या काळजीविषयी जाणून घेणार आहोत.
म्हैशीबद्दल थोडक्यात:
- म्हशीची मुख्य ओळख म्हणजे तिचा काळा रंग.
- म्हशीच्या संपूर्ण शरीरावर काळे केस असतात.
- म्हशीची कातडी जाड असते.
- म्हशीची उंची 6 ते 7 फूट असून, वजन 700 ते 900 किलो पर्यंत असते.
- म्हशीचे दूध जाड असते, जे तूप काढण्यासाठी आणि लोणी बनवण्यासाठी वापरले जाते.
- म्हशीच्या दुधात चरबी गाय आणि शेळीपेक्षा जास्त असते.
- म्हशीच्या दुधात प्रथिने, चरबी, कर्बोदके, कॅल्शियम आढळतात.
- म्हैस एक शाकाहारी प्राणी आहे जो फक्त गवत आणि चारा खातो.
- म्हशीला चरण्यासाठी धान्यही दिले जाते.
कशी घ्यावी दुभत्या म्हशींची काळजी?
- म्हशींचे दुधदोहण शांत वातावरणात करावे.
- कर्कश मोठा आवाज उदा. फटाक्यांचा आवाज, लाऊडस्पिकरचा आवाज याने म्हशी बिचकू शकतात. त्यामुळे त्यांचे रवंथ कमी होते. दुधाचे प्रमाण कमी होते यामुळे, शांततेत दुध दोहन करावे.
- म्हशींवर उष्ण वातावरणात गार पाणी मारावे. थंडीत त्यांच्या अंगावर उबदार गोण टाकावा.
- म्हशींना पाण्याचा फवारा, तुषार यापेक्षा डुंबण्यासाठी डोह अगर वेगळा हौद असेल तर उत्तम असते.
- म्हशींना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असे डुंबावयास सोडावे.
- ताज्या व्यालेल्या म्हशींना व्याल्यानंतर सात-आठ दिवस डुंबावयास सोडू नये. त्यांच्यावर गोठ्यातच गार पाणी मारावे.
- म्हशींना नियमित वेळेवर ताजे, स्वच्छ पाणी पाजावे.
- प्रत्येक म्हशीला बसण्यासाठी, आडवे रेलण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. तशी जागा नसेल तर उठताना एकमेकांच्या सडावर पाय पडून सडांना इजा होऊ शकते.
- म्हशींच्या गोठ्यातील जमीन निसरडी नसावी. नाहीतर म्हशी घसरुन त्यांचे पाय मोडू शकतात. अशा निसरड्या जमिनीवरून उठताना मागच्या पायाच्या खुरांचा फटका सडावर-कासेवर बसतो व कासेला/सडांना इजा होते.
तुम्ही तुमच्या दुभत्या म्हशींची काळजी कशी घेता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ