पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Jan
Follow

दुध दरात पुन्हा प्रतिलिटर 5 ते 6 रुपयांची घसरण

सांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात 50 किलो पोत्याला 100 ते 150 रुपये वाढले असून, गायीच्या दुधाचे दर प्रति लीटर 5 ते 6 रुपयांनी उतरले आहेत.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ