पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 June
Follow

दुधाच्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्र्यांना कात्रज डेअरीच्या अध्यक्षांचे साकडे

गेल्या काही महिन्यापासून दुधाचे भावात सतत घसरण होत आहे. सरकारी अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला असून आता आक्रमक झाला आहे. तर याच प्रश्नावरून राज्यातील दूध उत्पादक आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. यादरम्यान दुध उत्पादक शेतकऱ्यांना रखडलेले प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पासलकर यांनी बुधवारी (ता. २६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन दिले.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ