पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 May
Follow
दुष्काळाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारनंही सोडलं वाऱ्यावर
एकीकडे अस्मानी संकटाचा तडाखा तर दुसरीकडे सुलतानी संकटाच्या फटक्यात शेतकरी भरडून निघाला. उन्हाच्या कहरामुळं कुठे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली. तर कुठे अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं. गेल्यावर्षीचा खरीप आणि रब्बी हंगाम निसर्गाच्या लहरीपणानं वाया घालवला. त्यामुळं शेवटी शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती सरकारी मदतीच्या हाताची. पण लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याची संधी सरकारनं सोडली नाही. शेतमालाचे भाव पाडण्याचा चंगच बांधला. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ