पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Feb
Follow

दूध अनुदानाची प्रतीक्षा महिनाभरानंतरही कायम

दुधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारकडून घोषणा करण्यात आली. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. दूध संकलन केंद्र, दूध खरेदीदार संघाकडून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ॲपमध्ये भरली नसल्याने अनुदान कसे द्यायचे, असा प्रश्‍न दुग्धविकास विभागासमोर आहे. अनुदान मिळणार मात्र ते कधी मिळणार याची स्पष्टता नाही. ‘एसएनएफ व फॅट’ची अट अडचणीची ठरणार असल्यानेही शेतकरी हतबल आहेत.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ