पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 July
Follow

दूधदर समस्येवर रास्त तोडगा

राज्यात गायीच्या दुधाला सध्या प्रतिलिटर २५ ते २७ रुपये दर मिळतोय. दूध उत्पादनाला खर्च मात्र प्रतिलिटर ३२ ते ३३ रुपये येतोय. अर्थात, दुधाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दराची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. या दरम्यानच खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर देणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले. त्याचबरोबर जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ