पोस्ट विवरण
सुने
कृषि
स्ट्रॉबेरी
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
23 Sep
Follow

स्ट्रॉबेरी शेतीतून होईल लाखोंची कमाई! ( Earn Millions from Strawberry farming! : Strawberry Crop Cultivation)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. स्ट्रॉबेरीची लागवड ही ठराविक ठिकाणीच होत असते पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली  आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळा भोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे. कारण या फळाचे नाविन्य, त्यातील पोषण मूल्य आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली चांगली मागणी यामुळे भारतात स्ट्रॉबेरी क्षेत्रात वाढ होत आहे. आजच्या आपल्या या भागात आपण याच आकर्षक पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य जमीन:

  • स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी, हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन वापरावी.
  • जमिनीचे पीएच 5.5 ते 6.5 या दरम्यान असावे.
  • भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य हवामान:

  • स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते.
  • हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात 10 अंश ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होते तसेच उष्ण हवामानात 20 ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात फुल निर्मिती होऊन फळधारणा दीर्घकाळ चालू राहते.
  • समशीतोष्ण वातावरणात स्ट्रॉबेरीची चांगली वाढ होते.
  • हे कमी सूर्यप्रकाश आवश्यक असणारे पीक आहे.
  • पीक फुलोर्‍यावर येत असताना आठ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश, 10 दिवस आवश्यक असतो.
  • हिवाळ्यात वनस्पती सुप्तावस्थेत असते व तिची कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही.
  • वसंत ऋतूत जेव्हा दिवस अधिक मोठे होत असतात आणि तापमान वाढते तेव्हा वनस्पतीची वाढ होऊन फुले येण्यास सुरुवात होते.
  • उपोष्ण कटिबंधातील जातींना अतिथंड हवामानाची गरज नसते व त्या शिशिर ऋतूत थोड्या फार वाढतात.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य हंगाम:

  • स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.
  • पश्‍चिम घाटातील डोंगराळ प्रदेशात स्ट्रॉबेरीची लागवड पाऊस थांबताच म्हणजे ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात तर सपाट प्रदेशात जुलै - ऑगस्ट महिन्यात करणे योग्य ठरते.

स्ट्रॉबेरीच्या विविध जाती:

स्ट्रॉबेरीच्या मुख्यत्वेकरून स्वीट चार्ली, केमरोजा, सेलवा, रानिया, कॅलिफोर्निया, रजिया, विंटरडोन इत्यादी स्ट्रॉबेरीच्या जाती आहेत.

स्ट्रॉबेरी लागवड पद्धत:

  • स्ट्रॉबेरी पिकाची लागवड गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेमी अंतरावर करावी.
  • स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या पंधरा ते वीस सेमी पर्यंत थरातच वाढतात.
  • स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत.
  • गादीवाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीने सुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे वाफे तयार करावेत.
  • दोन ओळी पद्धतीसाठी 90 सेमी रुंद व 30 ते 45 सेमी उंच असलेल्या दोन रोपातील अंतर 30 सेमी व दोन ओळींतील अंतर 60 सेमी असावे.
  • दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागतात.
  • तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेमी रुंद व 30 ते 45 सेमी उंचीचे गादी वाफे करावेत.
  • चार ओळी पद्धतीने लागवड करता येत असली तरी अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते.

स्ट्रॉबेरी पिकाची घ्यावयाची काळजीः

  • वनस्पतीची मुळे मातीच्या पृष्ठभागावर पसरतात.
  • त्यामुळे ओलसर माती वापरणे आवश्यक आहे.
  • अंकुरण हळूहळू व्हायला हवे आणि नाजूक रोपांना तणांपासून मुक्त ठेवायला हवे.

स्ट्रॉबेरी पिकातील खत व्यवस्थापन:

  • स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करताना जमिनीत कुजलेल्या शेणखताचा जास्त वापर करावा.
  • 40 ते 50 टन तसेच एकरी दीडशे किलो युरिया,  200 किलो सुपर फॉस्फेट, 100 किलो पोटॅश वापरावे.
  • त्यातील 200 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश आणि 50 किलो युरिया लागवडीच्या वेळी द्यावे. 50 किलो पोटॅश 45 दिवसांनी द्यावे. तसेच विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून द्यावीत.

स्ट्रॉबेरी पिकातील पाणी व्यवस्थापन:

  • स्ट्रॉबेरी पिकास जास्त पाणी लागत नाही. तसेच जास्त काळ ओलावा राहिल्यास रोपांची मर आणि फळकुज होते म्हणून पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • तसेच पाण्याचा फूल व फळ धारणेच्या वेळी ताण पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
  • रोपाची लागवड झाली की दोन ते तीन दिवस रोज पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.

रोग:

  • पानावरील ठिपके
  • फळकुज

उत्पादन व काढणी:

  • स्ट्रॉबेरीची पक्व झालेली फळे काढून पारदर्शक प्लास्टिकच्या कोरोगेटेड बॉक्स मध्ये प्रतवारी करून पॅकिंग करावे.
  • स्ट्रॉबेरीची फळाच्या काढणीची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी.
  • स्ट्रॉबेरीची काढणी आठवड्यातून 3-4 वेळा होते.
  • साधारणपणे एका झाडापासून चाळीस ते पन्नास फळ येतात व सर्व साधारण 8 ते 12 टन उत्पादन मिळते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार व योग्य हवामानानुसार स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड कशाप्रकारे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. स्ट्रॉबेरी पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते.

2. स्ट्रॉबेरीचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

स्ट्रॉबेरीचे पीक पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या, हलक्या, मध्यम काळ्या, वालुकामय पोयटा तसेच गाळाच्या जमिनीत घेता येते.

3. स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य लागवड हंगाम कोणता?

स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.

55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ