सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
एकोणीस कारखान्यांकडून २२ लाख टन उसाचे गाळप

मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यांतील एकूण १९ कारखान्यांनी २० डिसेंबरपर्यंत २२ लाख १६ हजार ६०४ टन उसाचे गाळप करत १५ लाख ३८ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचे माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उत्पादन ६.९४ टक्के इतका राहिला आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी सुमारे २१ कारखाने पुढे आले होते. त्यापैकी २० डिसेंबर अखेरपर्यंत १९ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप हंगामात सहभाग घेतला. त्यामध्ये नंदुरबार, जळगाव मधील प्रत्येकी एक जालन्यातील चार, छत्रपती संभाजीनगरमधील सहा व बीडमधील कारखान्यांचा समावेश आहे. या १९ कारखान्यांमध्ये ११ सहकारी तर आठ खासगी कारखाने आहेत.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
