सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'एनसीसीएफ'च्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच

केंद्र सरकारच्या ग्राहक व व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून ५ लाख टन रब्बी कांदा खरेदीची घोषणा झाली. तर राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) तर्फे ७ मे पासून ५० खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी सुरू होईल, अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. आचारसंहितेच्या काळातही सरकार शेतकऱ्यांसाठी किती कामे करत आहे असा, सूर पत्रकार परिषदेत दिसून आला. मात्र या वेळी केलेली ही घोषणा नावापुरतीच उरली आहे. मतांवर डोळा ठेवून सरकार फक्त घोषणा करत असल्याची टीका कांदा उत्पादकांमधून होऊ लागली आहे.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
