सुने
पशुसंवर्धन
DeHaat Channel
11 Mar
Follow
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मेंढ्यांच्या जाती (Famous Sheep breeds of Maharashtra)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मेंढ्यांच्या जाती (Famous Sheep breeds of Maharashtra)
महाराष्ट्राचा बराच मोठा प्रदेश विशेषतः अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सांगली हे जिल्हे पालनासाठी प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यांमध्ये अनुकूल हवामान आणि चराईच्या जमिनीची उपलब्धता असल्याने ते मेंढीपालनासाठी योग्य ठरतात. तसेच या जिल्ह्यांमध्ये मेंढीपालनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार विविध योजना व अनुदानही देते. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील मेंढ्यांच्या जाती:
माडग्याळ मेंढी:
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावचे सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहंकाळ, रांजणी या भागात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात.दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान, रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्याची शरीरवाढ चांगली असून बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत आहेत.
दख्खनी मेंढी:
उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात.
तुम्ही कोणत्या मेंढ्यांचे पालन करता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाप्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.
74 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ