पोस्ट विवरण
सुने
उर्वरक
कृषि
टमाटर
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
9 Apr
Follow

टोमॅटो पिकातील खत व्यवस्थापन (Fertilizer management in Tomato crop)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे २० टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, नागपूर, सांगली आणि सोलापूर आहेत. खरीप, रब्‍बी, उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. आहारदृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक अशा या टोमॅटो पिकातील खत व्यवस्थापना विषयीची माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

टोमॅटो पिकाच्या अवस्थेनुसार करावयाचे खत व्यवस्थापन:

टोमॅटो पुनर्लागवडीच्या एक दिवस आधी द्यावयाचा बेसल डोस:

  • 18:46:00 (ईफको-DAP) 50 किलो + MOP (महाधन) 25 किलो + मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट (IFC) 10 किलो + निंबोळी पेंड 50 ते 100 किलो + कार्बो फ्युरॉन 7 किलो हा बेसल डोस व्यवस्थित एकत्रित करून बेड मध्ये भरून घ्यायचा.
  • त्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर अंथरून चांगल्या प्रकारे पाणी देऊन पिकाची पुनर्लागवड करावी.

विद्राव्य खते:

टोमॅटो पुनर्लागवडीनंतर 10 दिवसांत:

12:61:00 (देहात न्यूट्री-MAP) 2 किलो + पोटॅशिअम ह्युमेट 98% (देहात न्यूट्री-पंच) 500 ग्रॅम प्रति एकरी आळवणी करून किंवा ड्रेंचिंग च्या माध्यमातून द्यावे.

खतामुळे होणारा फायदा:

  • सुरुवातीच्या अवस्थेत टोमॅटो पिकाच्या मुळ्यांची चांगली वाढ होते.
  • फुटवा चांगला येतो.
  • खोलपर्यंत मुळ्या जातात तसेच सुरवातीचे रोपांचे सेटिंग चांगले होऊन पिकाची चांगली वाढ होते.

टोमॅटो लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांत:

  • 19:19:19 (देहात न्यूट्री-NPK) 50 ग्रॅम + समुद्री शेवाळ अर्क (आनंद अॅग्रो केअर-सीरुबी) 15 ग्रॅम या प्रमाणात प्रति पंपासाठी घेऊन फवारणी करावी,
  • 19:19:19 (देहात न्यूट्री-NPK) 3 किलो + NPK bacteria (डॉ. बॅक्टोज कॉम्बो) 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळून आळवणी किंवा ड्रेंचिंगद्वारे द्यावे.

खतामुळे होणारा फायदा:

  • या डोसमुळे शाखीय वाढ चांगल्याप्रकारे झाल्याचे दिसून येईल.
  • खत ग्रहण करण्याची क्षमता वाढणार आहे.

टोमॅटो लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांत:

  • 12:61:00 (देहात न्यूट्री-MAP) 70 ग्रॅम + चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट (आनंद अॅग्रो केअर-इंस्टाफर्ट कॉम्बो) 15 ग्रॅम + सिलिकॉन (देहात न्यूट्री-सिलिका) 15 ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
  • 13:40:13 (देहात न्यूट्री-NPK) 3 किलो प्रति एकर ड्रेंचिंग च्या माध्यमातून द्यावे.

खतामुळे होणारा फायदा:

  • या खतामुळे मायक्रो न्यूट्रिएंटची कमतरता भरून निघते.
  • वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.
  • सोबतच कीड रोगांप्रती लढण्याची प्रतिकारक्षमता तयार होते.

टोमॅटो लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांत:

  • 13:00:45 (देहात न्यूट्री-NPK) 75 ग्रॅम + N-14.5%, Ca 17%, Boron 0.3% (देहात न्यूट्री-कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॉन यांचं संयुक्त मिश्रण असलेलं खत) 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • 0:52:34 (देहात न्यूट्री-MKP) 3 किलो + चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट (आनंद अॅग्रो केअर-इंस्टाफर्ट कॉम्बो) 250 ग्रॅम + बोरॉन 20% (देहात न्यूट्री-DOT) 250 ग्रॅम आळवणी किंवा ड्रीप च्या माध्यमातून द्यावे.

टोमॅटो लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांत:

  • 0:52:34 (देहात न्यूट्री-MKP) 75 ग्रॅम + बोरॉन 20% (देहात न्यूट्री-DOT) 15 ग्रॅम + समुद्री शेवाळ अर्क (आनंद अॅग्रो केअर-सीरुबी) 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.
  • 0:52:34 (देहात न्यूट्री-MKP) 3 किलो + बोरॉन 20% (देहात न्यूट्री-DOT) 250 ग्रॅम + वनस्पती अर्क (Prime Chiron) 500 मिली एकत्रित करून ड्रीपच्या माध्यमातून द्यावे.

टोमॅटो लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांत:

  • 13:00:45 (देहात न्यूट्री-NPK) 75 ग्रॅम +  N-14.5%, Ca 17%, Boron 0.3% (देहात न्यूट्री-कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॉन यांचं संयुक्त मिश्रण असलेलं खत) 15 ग्रॅम + समुद्री शेवाळ अर्क (आनंद अॅग्रो केअर-सीरुबी) 15 ग्रॅम एका पंपासाठी एकत्रित करून फवारणी करावी.
  • 13:00:45 (देहात न्यूट्री-NPK) 3 किलो + बोरॉन 20% (देहात न्यूट्री-DOT) 250 ग्रॅम + वनस्पती अर्क (Prime Chiron) 500 मिली एकत्रित करून ड्रीप किंवा आळवणीच्या माध्यमातून द्यावे.

टोमॅटो लागवडीनंतर 100 ते 120 दिवसांत:

  • 00:00:50 (देहात न्यूट्री-SOP) 75 ग्रॅम + मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट (IFC) 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • 00:00:50 (देहात न्यूट्री-SOP) 3 किलो + मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट (IFC) 250 ग्रॅम + वनस्पती अर्क (Prime Chiron) 500 मिली एकत्रित करून ड्रीप किंवा आळवणीच्या माध्यमातून द्यावे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणी असो किंवा आळवणी या दोन्ही गोष्टींमध्ये स्टिकरचा वापर आवश्य करा.
  • फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये. ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकात खत व्यवस्थापन कसे करता? आणि कोणती खते वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड केव्हा केली जाते?

टोमॅटो हे तीन हंगामी पीक असल्यामुळे ते आपण एका वर्षात तिन्ही हंगामात घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात पहिली लागवड केली जाते त्यानंतर, पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत दुसरी लागवड केली जाते आणि त्यानंतर शेवटची लागवड ही ऑक्टोंबर ते डिसेंबर या महिन्याच्या कालावधीत केली जाते. जवळपास आपण वर्षातले बाराही महिने टोमॅटो पिकाची लागवड करू शकतो.

2. टोमॅटो पीक वाढण्यास किती कालावधी लागतो?

टोमॅटो लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा जर आपण काळ पाहिला तर टोमॅटो रोपाच्या वाढीसाठी 50 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो.

3. टोमॅटो लागवड कुठे केली जाते?

महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर या भागात खूप जास्त प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ