गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्र

पशुपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर न येणे आणि माजावर आल्यानंतर वारंवार उलटणे. पशुतज्ज्ञ गाई, म्हशींच्या प्रजनन संस्थेची तपासणी हाताने करत असतो, परंतु त्यास काही मर्यादा आहेत. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून कमीतकमी दिवसात अचूक निदान आणि योग्य उपचार करणे शक्य होत आहे. साधारणपणे गाई, म्हशीमध्ये वर्षाला एक वेत ही संकल्पना प्रत्यक्ष पशुपालकाच्या गोठ्यामध्ये राबविणे आवश्यक आहे. गाय म्हैस व्यायल्यानंतर साधारणपणे 60 ते 80 दिवसात माजावर येणे अपेक्षित आहे, परंतु तसे काही प्रमाणातच होते. यामुळे भाकडकाळ जास्त दिवसाचा होतो आणि दुग्धव्यवसायात तोटा सहन करावा लागतो. भाकडकाळाचा कालावधी जास्त असण्यामागे महत्त्वाची दोन कारणे म्हणजेच माजावर न येणे आणि माजावर आली तरी वारंवार उलटणे. याबाबत निदान करण्यासाठी गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान फायदेशीर ठरणारे आहे. अल्ट्रासोनोग्राफी यंत्रामुळे अचूक निदान होते. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारची हानी जनावरांना होत नाही.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
