पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

गाय दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाबाबत नवी अपडेट, जाणून घ्या

राज्य सरकारने गाय दुधासाठी 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी त्यांच्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी, अद्यावतीकरण भारत पशुधन पोर्टलवर (NDLM) करण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. एम. शिंदे यांनी केले आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ