पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

गायीच्या खरेदी दूध दरात १ रूपयांनी वाढ; राज्यातील सहकारी, खाजगी दूध संघांचा निर्णय

देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर आणि बटरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रूपयांची वाढ केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा या दोन दूध संघांनी वाढ केली नाही. ज्या दूध संघांनी दरवाढ केली आहे, त्या दूध संघांकडून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर दिला जाणार आहे. यापूर्वी गोकुळ आणि वारणा दूध संघाने दर वाढवून दिल्याने त्यांनी खरेदी दरात वाढ केली नाही.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ