पोस्ट विवरण
सुने
कृषि ज्ञान
जिरॅनियम
कृषी ज्ञान
DeHaat Channel
29 Mar
Follow

जिरॅनियमची शेती (Geranium Farming)

जिरॅनियमची शेती (Geranium Farming)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आजच्या आपल्या लेखात आपण एका खास फुलाच्या म्हणजेच जिरॅनियमच्या शेतीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. जिरॅनियम ही एक फुल वर्गीय वनस्पती असून ती मूळत: दक्षिण आफ्रिकेतील फुलांच्या वनस्पतीची एक जात आहे. या पिकाची लागवड त्याच्या सुवासिक पानांसाठी केली जाते. या झाडाची फुले लाल किंवा पांढऱ्या रंगाची असतात. या फुलांपासून मिळणाऱ्या तेलाचा वापर सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने, आणि अरोमाथेरेपीसाठी केला जातो. भारतीय शेतकऱ्यांसाठी जिरॅनियमची शेती ही आर्थिक प्रगती साधण्यासाठी फायदेशीर ठरतं आहे. जिरॅनियमच्या शेती मधून उत्पादन घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे. पारंपरिक पिकांना जिरॅनियम हा पर्यायी उपाय आहे यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक भक्कम स्रोत लाभले आहे.

जिरॅनियम काय आहे (What is Geranium)?

 • मित्रहो जिरॅनियम ही एक सुगंधी वनस्पती आहे.
 • या वनस्पतीला आता गरिबांचा गुलाब असे सुद्धा संबोधले जाते.
 • या वनस्पतीच्या माध्यमातून तेलाची निर्मिती होते आणि हे तेल अगदी उपयुक्त ठरत आहे.
 • जिरॅनियमच्या वनस्पतीपासून तेल निघते आणि त्या तेलापासूनच विविध सौंदर्यप्रसाधने परफ्युम यासोबतच सुगंधी कोणत्याही वस्तू असतील म्हणजे साबण, परफ्युम इत्यादी गोष्टी बनवतात.
 • विशेष गोष्ट म्हणजे देशामध्ये जिरॅनियमच्या तेलाची जितकी मागणी आहे तितके उत्पादन नसल्यामुळे या वनस्पतीच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

जिरॅनियम लागवडीसाठी जमीन (Soil):

 • जिरॅनियम लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आवश्यक असते.
 • मात्र सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते.
 • माळरानावरही जिरॅनियमचे पीक घेता येते म्हणजेच जिथे, टॅक्टरनी नांगरता येते अशा कोणत्याही जमिनीत जिरॅनियमचे पीक घेता येते.

जिरॅनियम लागवडीसाठी हंगाम (Season) :

जिरॅनियम बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे.

जिरॅनियम लागवडीसाठी हवामान (Weather):

 • सामान्य तापमानात वाढणारी ही वनस्पती आहे . (15 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत )
 • ही कधीही कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही हवामानात होणारी वनस्पती आहे.
 • भारतात जिरेनियमसाठी लागवडीचा हंगाम सामान्यतः फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येतो हा काळ जिरेनियम लागवडीसाठी आदर्श काळ मानला जातो.

जिरॅनियम पिकाची लागवड (Geranium Cultivation) :

 • या पिकाची लागवड करताना शेतीची योग्यप्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. कारण तीन वर्ष हे पीक शेतात राहणार असते.
 • मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावेत. त्यावर ठिबक टाकावे आणि चार बाय दीड फुटावर त्याची लागवड करावी.
 • पिकाची लागवड सरी पद्धतीने करावी.
 • एकरी साधारणतः दहा हजार रोपे लागतात.
 • एका रोपाची किंमत 4₹ असते.
 • मल्चिंग पद्धतीने सुद्धा या पिकाची लागवड होते.
 • इतर पिकांप्रमाणेच या पिकालाही खते व पाण्याचा पुरवठा करावा लागतो.
 • जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाहीत.

जिरॅनियम लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन (Water Management) :

 • जिरॅनियमच्या पिकाला सिंचनाची कमी आवश्यकता असते. सुगंधित शेती साठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते.
 • अति पाण्याचा ताण या वनस्पतीला सहन होत नाही.
 • पाण्याच्या फवाऱ्याने म्हणजे तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनासारख्या साधनांनी ही शेती करता येऊ शकते.
 • आपल्याकडे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये भूमिगत जलस्तर कमी होण्याची समस्या उग्र स्वरूपात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल.

जिरॅनियम पिकाची कापणी (Harvesting) :

 • लागवडी नंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते. अशाप्रकारे हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.
 • एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे.
 • एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळू शकते.
 • एक लिटर ऑईलला किंमत जाग्यावर 12000 - 12,500 हजार रु मिळू शकतात.
 • एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच तेल मिळू शकत.
 • एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.

जिरॅनियम लागवडीचे फायदे (Benefits) :

 • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने) लागवडीनंतर सुमारे 120 ते दीडशे दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते.
 • एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते.
 • प्रत्येक कापणी मधून12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते.
 • एक टन पाल्यापासून सरासरी एक किलो याप्रमाणे तेल मिळते.
 • तेलाची किंमत बारा हजार पाचशे रुपये प्रति किलो मिळते.
 • तेल काढण्यासाठी लागणाऱ्या मशीनची किंमत तीन लाखांपासून ते बारा लाखांपर्यंत असते.
 • या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते.

जिरॅनियम पिकाची काळजी:

जिरॅनियम या पिकाच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पीकाला पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात या पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.

अशा प्रकारे योग्य रित्या, अशा प्रकारे योग्य रित्या, जिरॅनियम पिकाची लागवड केल्यास आपल्याला देखील जिरॅनियम लागवडीतून भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या जिरॅनियमच्या पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जिरॅनियम म्हणजे काय?

जिरॅनियम ही एक सुगंधी वनस्पती आहे. या वनस्पतीला गरिबांचे गुलाब असे सुद्धा संबोधले जाते.

2. जिरॅनियमचा उपयोग काय?

या वनस्पतीच्या माध्यमातून तेलाची निर्मिती होते आणि हे तेल अगदी उपयुक्त ठरत आहे. जिरॅनियमच्या वनस्पतीपासून तेल निघते आणि त्या तेलापासूनच विविध सौंदर्यप्रसाधने यासोबतच सुगंधी वस्तू म्हणजे साबण, परफ्युम इत्यादी गोष्टी बनवतात.

3. जिरॅनियमचे पीक वर्षभरात किती वेळा येते?

एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा जिरॅनियम या पिकाचे उत्पादन मिळते.

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ