सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Mar
Follow
घाटनांद्रा-धारला शेतशिवारामध्ये बहरले सूर्यफुलाचे पीक

घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारणेर, वाडी, पेंडगाव आदी शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरात आले आहे. सोयाबीन, भुईमूग या खाद्य तेल पिकांपाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारातील शेतकरी सूर्यफुलाचे उत्पन्न घेण्याकडे वळले आहेत. बाजारात सूर्यफुलाच्या खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने व शेती व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी, पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने घाटनांद्रा धारलासह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा सूर्यफूल लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
