गहू लागवडीसाठी देहातचे DWS 555 हे सर्वोत्तम वाण - श्री. अब्दुल मुन्सिफ
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणारे, आकर्षक कणीसे असणारे असे देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असा सल्ला देहातचे अमरावती जिल्हा विक्री अधिकारी श्री. अब्दुल मुन्सिफ यांनी अमरावतीमधील येसूर्न येथील पडोळे अॅग्रो एजन्सी येथे आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना दिला.
देहात कंपनी आयोजित गव्हाच्या DWS 555 या वाणाची माहिती पुरविण्याचा विशेष कार्यक्रम दि.19 डिसेंबर 2023 रोजी येसूर्न, तालुका-अचलपूर, जिल्हा-अमरावती येथील पडोळे अॅग्रो एजन्सी येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीमधील सुमारे 70 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या इतर सेवा, पशु खाद्य, पोषण उत्पादने, पीक संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
DWS - 555:
- झाडाची उंची: 98-105 सेमी
- प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
- उच्च उत्पन्न
- आकर्षक कणीसे
- 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
- काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.
- पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान
बियाणे दर: 40 किलो/एकर
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ