पोस्ट विवरण
गहू पिकासाठी खत व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य पीक आहे. ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. गहू हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. याच गहू पिकामध्ये जेव्हा आपण रासायनिक खत व्यवस्थापन करत असतो तेव्हा ते दोन प्रकारे करतो. एक म्हणजे दाणेदार खतांच्या स्वरूपात आणि दुसरं म्हणजे विद्राव्य खतांच्या स्वरूपात, जी आपण फवारणी माध्यमातून देतो. आजच्या भागात आपण याच गहू पिकातील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
दाणेदार खताच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन:
- बागायती गव्हाच्या पिकासाठी एकरी 3 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे.
- बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी एकरी 45 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 20 किलो पालाश म्हणजेच युरिया 30 किलो + डीएपी - 50 किलो + एम ओ पी 30 किलो दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र म्हणजेच 50 किलो युरिया पेरणीनंतर 3 आठवडयांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.
- जिरायती गव्हासाठी आणि उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण एकरी 30 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश म्हणजेच युरिया 20 किलो + 10:26:26 (ईफको एनपीके) - 75 किलो इतके दयावे. निम्मे नत्र व स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र म्हणजेच 30 किलो युरिया पेरणीनंतर 3 आठवडयांनी दयावे.
- बेसल डोस देताना रासायनिक खतांसोबत सल्फर 90% दाणेदार - 8 किलो + मायक्रोनुट्रीएंट 10 किलो प्रति एकरी द्यावे.
फवारणी माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन:
- लागवडीनंतर 25 दिवसांनी - 19:19:19 (देहात न्यूट्री एनपीके) - 3 ग्रॅम + बूस्ट मास्टर (देहात न्यूट्री वन) 2 मिली/लिटर + प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- लागवडीनंतर 40 दिवसांनी - 12:61:00 (देहात न्यूट्री एमएपी) - 5 ग्रॅम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 13:00:45 (देहात न्यूट्री केएनओ3) - 5 ग्रॅम + सीवीड एक्सट्रॅक्ट 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- लागवडीनंतर 100 दिवसांनी - 00:00:50 (देहात एसओपी) - 5 ग्रॅम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तुम्ही गहू पिकात खत व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ