पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
गेहूं
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
7 Jan
Follow

गहू पिकातील तण व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

भारतातील गहू लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक असून, गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. 30 टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. याच गव्हाच्या पिकात गहू पेरणीनंतर तणांची पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि पुरेशी जागा यासाठी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण गहू पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

गहू पिकात प्रामुख्याने आढळणारे तण:

बथुआ, हिरणखुरी, मोथा गवत, वनबत्री, आक्री, जंगली ओट्स, कृष्णनिल इत्यादी गहू पिकामध्ये प्रामुख्याने आढळणारे तण आहेत. ते जास्त प्रमाणात झाल्यास गव्हाचे उत्पादन 35 ते 40 टक्के कमी होते. तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. चला आता पाहूया तण व्यवस्थापनाविषयी.

मोकळ्या शेतात लागवडी अगोदर वापरावयाचे तणनाशक:

  • पैराक्वाट डाइक्लोराइड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) - बिन-निवडक, गवत 6 इंच उंच होण्याच्या अगोदर 800-1000 मिली एकरी वापरावयाचे तणनाशक.
  • ग्लायफोसेट (देहात-MAC7) - बिन-निवडक, गहु लागवडी पूर्वी 800-1000 मिली एकरी वापरावयाचे तणनाशक.

गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीपूर्वी वापरावयाची तणनाशके:

  • पेंडीमेथिलिन 30% ईसी (ईफको-जाकीयामा) - गहू पेरणीनंतर ताबडतोब दहा लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मि.लि. या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. उगवुन आलेले तण यामुळे नियंत्रणात येत नाही.

गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीनंतर वापरावयाची तणनाशके:

  • मेटसल्फ्यूरोन मिथाईल 20% डब्ल्यूपी (ईफको-माकोतो) - गहू उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांत वापारवे. वापर केल्यानंतर गव्हाची पाने काही प्रमाणात पिवळी पडू शकतात, मात्र 2 आठवड्यात पुर्वव्रत होतात. वापर केल्यानंतर कडाक्याची थंडी पडल्यास मात्र गव्हांस जास्त ईजा पोहचते.
  • मेटसल्फ्यूरोन मिथाईल 20% डब्ल्यूपी (ईफको-माकोतो) - लागवडीनंतर 25 ते 35 दिवसांत वापरावे. तणास 2 ते 4 पाने असावीत आणि जमिनीत ओल असावी. रेसिड्युअल इफेक्ट असल्यामुळे जास्त काळ नियंत्रण मिळते.

टीप -

  • तणनियंत्रणासाठी काही इतर पर्याय उपलब्ध नसल्यासचं तणनाशकांचा वापर करावा.
  • शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर केल्यावर सुद्धा पिकांची वाढ काही काळापुरती मंदावत असते.
  • शेजारील व आंतरपिकांचा विचार करून तण नाशकाची फवारणी करावी.

तुमच्या गव्हाच्या पिकात कोणत्याप्रकारचे तण आढळून आले? तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळविले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ