Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 July
Follow

'गोकुळ'च्या गाय दूध विक्रीत दोन रुपयांची वाढ

राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय दूध दरात वाढ केली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने मुंबई आणि पुणे येथे विक्री होणाऱ्या गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, पूर्वी प्रतिलिटर गाय दूध ५४ रुपयेला विक्री होत होते. आजपासून हाच दूध दर ५६ रुपये झाला असल्याचे परिपत्रक काढले आहे. 'गोकुळ'च्या गाय दुधाची मुंबईमध्ये तीन लाख लिटर आणि पुण्यात ४० हजार लिटरची विक्री होते. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या संघांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor