पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
चना
कृषि ज्ञान
हरभरा
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
5 Nov
Follow

हरभरा पिकामधील मर रोग व्यवस्थापन (Gram - Wilt Disease Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. महाराष्ट्रात एकूण 13.53 लक्ष हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाचे असून उत्पादन 11.80 लाख टन एवढे आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पिक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अं.से. आणि 21 अं.से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पिक जास्तीत जास्त उत्पादन देते. मात्र हरभरा पिकाचे उत्पादन कमी होण्याची मुख्य कारणे म्हणजे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड. अलीकडच्या काळात मुख्यतः हरभरा पिकाला भेडसावणारा प्रश्न झालाय तो म्हणजे हरभरा पिकात वाढणारा मर रोग आजच्या या लेखात आपण याच रोगाच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

हरभरा पिकातील मर रोगाविषयी (Gram-Wilt Disease):

  • वातावरणातील बदल आणि बीज प्रकियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर (Chana Crop) मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून 'फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम'या बुरशीमुळे होतो.
  • या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी दिसून येतात.

मर रोगाची लक्षणे (Gram-Wilt Disease Symptoms):

  • मर रोगाची बुरशी बियाण्यातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते आणि खोडाच्या आतील भागात वाढते परिणामी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पानाकडे होणारा पुरवठा बंद होतो व त्यामुळे सुरवातीला या रोगात कोवळी पाने व फांद्या सुकतात आणि शेवटी पूर्ण झाड वाळून जाते.
  • या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियांद्वारे होतो.
  • प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे मरून जाते.
  • रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊन पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते.

आता जाणून घेऊया मर रोगाला आळा घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रायकोडर्मा जैविक बुरशीच्या वापर व फायद्यांविषयी :

  • मर रोगाला आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग ज्या मित्र बुरशीचा वापर करत आहेत ती म्हणजे जगातील शक्तिशाली असलेली ट्रायकोडर्मा जैविक बुरशी.
  • या बुरशीच्या 90 च्या आसपास प्रजाती आढळतात.
  • सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या तंतुमध्ये विळखा घालून त्याभोवती आपले साम्राज्य वाढवते म्हणजेच तंतुमय वाढीचे आवरण तयार करते.
  • ही बुरशी ग्लायोटोक्झीन सारखी प्रतीजैविके निर्माण करून हानिकारक बुरशीला वाढीसाठी लागणारी सत्व शोषून घेऊन तिची वाढ पूर्णतः थांबवते व वाढ थांबल्याने कालांतराने मर रोगाची बुरशी नष्ट होते तसेच ट्रायकोडर्मा मित्र बुरशी पिकांच्या मुळांवर तयार केलेल्या आवरणावर एक्वायर्ड रेसिस्टंस (SAR) निर्माण करते त्यामुळे जमिनीतील हानीकारक बुरशीपासून पिकांचे रक्षण होते.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव शेतात दिसताच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माची आळवणी करावी किंवा शेणखतातून मातीत टाकावे.

मर रोगाचे रासायनिक व्यवस्थापन:

  • एकाच शेतात सतत हरभरा पीक घेणे टाळावे.
  • मर रोगग्रस्त जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
  • लागवडीपूर्वी 3 ग्रॅम कार्बेन्डाझिम 50% WP (क्रिस्टल-बाविस्टीन) प्रती किलो बियाण्यास लावावे. नंतर ५ ग्रॅम माइक्रोबैक्स ट्राइकोविन (ट्राइकोडर्मा विरिडी) या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
  • रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत.
  • रासायनिक पद्धतीने रोग नियंत्रण करताना कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची आळवणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या हरभरा पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. हरभरा पिकाची लागवड कधी करावी?

हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.

2. मर रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?

मर रोग हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून 'फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम'या बुरशीमुळे होतो.

3. हरभरा हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे.

44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ