पोस्ट विवरण
सुने
कृषि
चना
कृषि ज्ञान
हरभरा
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
27 Dec
Follow

हरभऱ्यावरील घाटेअळी व्यवस्थापन! (Gram: Pod borer (Helicovorpa armigera) insect management)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतात हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे. महाराष्ट्रात एकूण 13.53 लक्ष हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाचे असून उत्पादन 11.80 लाख टन एवढे आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पिक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अं.से. आणि 21 अं.से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पिक जास्तीत जास्त उत्पादन देते. मात्र हरभरा पिकावर होणाऱ्या किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. घाटे अळी ही खूप खाणारी अळी असून ती कोवळी पानं, फुल, कळ्या आणि घाट्या सर्व काही खावुन टाकते. घाटेअळी सुमारे १० ते ९०% उत्पादनाची हानी करू शकते. पिकाचे होणारे हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण हरभरा पिकातील घाटेअळी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

हरभऱ्यावरील घाटेअळीची लक्षणे (Symptoms of Helicovorpa armigera insects in Gram) :

  • अळी बाल अवस्थेत असताना पिवळ्या, गुलाबी, काळ्या किंवा राखडी रंगाची असुन कोवळी पाने, शेंगा व फांद्या यांवर आपली उपजीविका करते.
  • प्रारंभिक अवस्थेत पाने गळतात.
  • दुसऱ्या अवस्थेत पाने, शेंगा, कळ्या, फुले खाते.
  • तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाणे खाते.
  • अळीचे फक्त डोके शेंगांच्या आत घुसलेले असते आणि बाकीचे शरीर बाहेर लटकलेले दिसून येते.
  • गोल छिद्र असलेल्या शेंगा दिसतात.

हरभऱ्यावरील घाटेअळीचे उपाय (Remedy of Helicovorpa armigera insects in Gram) :

  • सहनशील जातींची लागवड करावी.
  • खोल नांगरट करावी.
  • लवकर पिकणाऱ्या जातीं बरोबर मोहरी, जवसचे आतंरपिक घ्यावे.
  • तुळशी सारखे रिपेलंट झाड आणि झेंडू सारखे सापळा पिक शेताच्या भोवती लावावे.
  • अळी खाणाऱ्या पक्ष्याला थांबण्यासाठी "टी" आकाराचे पक्षी थांबे तयार करावे.
  • घाटेअळीच्या नर पतंगास आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 5 कामगंध सापळे उभारावे. जेणेकरून किडींची संख्या नियंत्रित करता येईल.
  • अळीची सुरुवातीची अवस्था दिसल्यास निम तेल 10000 पी.पी.एम. किटकनाशक 25 मिली आणि स्टिकर 2 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • स्पिनोसॅड 45% एससी (बायर - स्पिनटोर) 100 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा
  • क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस - तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुलं दिसू लागताच क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (देहात - Ataque) ८० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास पुढील 30 दिवसांसाठी पिकाचे अळी सोबत इतर किडींपासून नियंत्रण होते.
  • या किडीचा प्रादुर्भाव सहसा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर सुरु होताना दिसतो. पिकास फुले व शेंगा लागल्यानंतर तो वाढलेला आढळतो.

तुम्ही तुमच्या हरभरा पिकामधील घाटेअळी किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. हरभरा पिकाची लागवड कधी करावी?

हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.

2. घाटेअळी कशी ओळखावी?

घाटेअळी बाल अवस्थेत असताना पिवळ्या, गुलाबी, काळ्या किंवा राखडी रंगाची असुन कोवळी पाने, शेंगा व फांद्या यांवर आपली उपजीविका करते.

3. हरभरा हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे.

34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ