पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
अंगूर
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
3 July
Follow

द्राक्षातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Grapes : Disease Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

द्राक्ष हे नगदी पीक आहे. हे बहुवर्षीय पीक असून, एकदा लागवड केल्यानंतर या पिकाचे आयुष्य साधारणतः 12 - 14 वर्षाचे असते. तेव्हा लागवडी संदर्भातील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहून निर्णय घेणे फारच महत्वाचे ठरते. द्राक्ष पीक हे देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते. राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत द्राक्ष लागवड होते. या फळपिकाच्या वाढीकरिता, तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते. द्राक्ष लागवडीकरिता द्राक्ष पिकात येणाऱ्या विविध रोगांची आणि लक्षणांची माहिती असणे देखील मोलाचे ठरते. द्राक्षाचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी किडींचा/रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. द्राक्ष पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होते. या पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या भागात आपण द्राक्ष पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.

रोगांची ओळख (Major diseases of Grapes) :

भुरी रोग (Grapes Powdery Mildew):

  • द्राक्ष पिकावर फळछाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो.
  • पाने, कोवळी फूट या भागांवर रोगाची लागण होते.
  • दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर दमट हवामानामुळे बुरशीचे बीजाणू लवकर वाढतात.
  • कमी ते मध्यम प्रकाश, 22 ते 28 अंश सेल्सिअस तापमान व दमट वातावरण भुरी रोगासाठी अनुकूल आहे.

लक्षणे (Symptoms):

  • पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात.
  • वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
  • घडांवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते.
  • कालांतराने हे डाग काळसर होतात आणि घडाचा दर्जा पूर्णपणे ढासळतो
  • हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
  • दमट हवामानात या रोगाचा प्रभाव जास्त होतो.
  • भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • हेक्साकोनाजोल 5% ईसी (टाटा - कॉन्टाफ) 300 मिली/300 लीटर किंवा
  • मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (Dow - systhane) 120 ग्रॅम/300 लीटर किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 300 मिली/300 लीटर  किंवा
  • डायफेनोकोनाझोल 25% ईसी (सिजेंटा - स्कोर) 150 मिली/300 लीटर किंवा
  • टेट्राकोनाझोल 3.8% ईडबल्यु (पेप्टेक बायोसाइंसेज - PBL) 225 मिली/ 300 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.

करपा किंवा अँथ्रॅकनोज (Grapes Anthracnose):

  • सेंद्रीय बुरशीनाशकांच्या वापरामुळे काही भागात या रोगाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येते.
  • एल्सिनॉई अ‍ॅमेसेलीना (Elsinoe amoslina) किंवा स्पोसिलोमा अ‍ॅम्पेलिनम (sphaceloma ampelinum) या बुरशीचे धागे अनेक पेशीय असतात दाट झुपक्याने एकत्र आढळतात.
  • या रोगाचा प्रादुर्भाव व जीवनक्रम संपल्यानंतर त्याच भागावर बुरशीचे धागे सुप्त अवस्थेत जातात.
  • पुन्हा अनकूल परिस्थिती प्राप्त होताच बीज तयार होऊन रोगाचा प्रादुर्भाव सुरु होतो.
  • या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जादा आर्द्रता किंवा पावसामुळे होतो.

लक्षणे (Symptoms):

  • करपा रोगामुळे द्राक्षाच्या पानावर बारीक ठिपके पडतात या ठिपक्यांचा आकार गोल किंवा कोनात्मक असतो.
  • ठिपक्याची कडा तपकीरी रंगाची असते.
  • रोगग्रस्त पानावर असंख्य ठिपके येतात.
  • त्याची वाढ झाल्यावर ऐकमेकात मिसळून संपूर्ण पान करपते त्यावर सुरुवातीच्या लागणीच्या ठिकाणी भोके पडतात.
  • या सुरुवातीची लागण बहुदा कमकुवत कोवळ्या पानावर होते.
  • नविन फुटीवर जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याचा भाग करपतो.
  • मध्यम रोगग्रस्त पाने वेडीवाकडी, आकारहीन दिसतात.
  • पानाप्रमाणे हा रोग द्राक्ष काडयावरही आढळतो.
  • सुरुवातीला जांभळट तपकिरी रंगाचे उभट गोलाकार किंवा कोनात्मक ठिपके आढळतात कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून ठिपक्यांचा मधला भाग खोलगट होतो.
  • त्यांची व्याप्ती काष्ठा पर्यत होते या रोगाची लागण पिक उत्पादनाच्या वेळी केव्हाही होते.
  • फुलोरा असतांनाही प्रादुर्भाव झाल्यास द्राक्षाचा फुलोरा करपून नष्ट होतो.

उपाय (Remedy):

  • पिकाची फेरपालट करावी.
  • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 300 ग्रॅम/ 300 लीटरने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • प्रोपीनेब 70% डबल्युपी (देहात-झिनॅक्टो) 900 ग्रॅम/ 300 लीटर किंवा
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डबल्युपी (कात्यायनी-COC 50) 600 ग्रॅम/ 300 लिटर किंवा
  • थियोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी (बायोस्टैड-रोको) 213 - 285 ग्रॅम/ 300 लिटर किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 8.3% + मॅन्कोझेब 66.7% डबल्युजी (ग्रीन लाईफ-शार्थक) 600 ग्रॅम/300 लीटर पाणी याप्रमाणात एकरी फवारणी करावी.

केवडा किंवा डाऊनी मिल्ड्यू (Grapes Downy Mildew):

  • द्राक्ष पिकातील प्लझमोपॅरा व्हीटीकोला (Plasmopara Viticola) या बुरशीचे धागे एक पेशीय नळीच्या आकाराचे असतात.
  • या बुरशीचे चर बीजूक वेलीच्या भागावर वाढत असतांना आपली मुळे (हॉसस्टोरिया) वेलीच्या पेशीत प्रवेशतात.
  • यांचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो.
  • पानाच्या आतील भागात वाढणारी बुरशी त्वचारंध्रामधून बाहेर दांडे काढते त्यावर अगणीत चर बुजूक तयार होऊन वारा पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करते.
  • भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो.
  • या रोगामुळे द्राक्ष पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
  • या रोगाला दमट वातावरण अनकूल असते.
  • या रोगाची लागण द्राक्षपिकात पाने, फुले, घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात, रोगग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते.
  • हा रोग द्राक्ष पिकात हमखास येणारा रोग आहे.

लक्षणे (Symptoms):

  • या रोगाची लक्षणे वेलीच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात.
  • हिरव्या पानावर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात.
  • पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते.
  • दमट हवामानात तो भाग रोगग्रस्त होऊन वेलीवरून गळतो.
  • हा रोग दमट वातावरणात बुरशीला दीर्घकाळ पोषक असल्यास संपूर्ण कोवळी पाने, फुले, फळे यावर आक्रमक होतो.
  • या रोगामुळे द्राक्ष वेलही जळून मरते द्राक्ष मणी अर्धवट वाढतात रोगग्रस्त मण्याच्या गाभ्यात व देठावर बुरशी वाढते त्यामुळे मण्याची कातडी जाड, सुरकुतलेली, करड्या रंगाची जाळीयुक्त होते रोगग्रस्त भागातील पेशी तपकिरी होतात.

नियंत्रणाचे उपाय (Management) :

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 600 ग्रॅम/ 300 लीटर किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 600 ग्रॅम/ 300 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • कॅप्टन 50% डबल्युपी (पेप्टेक बायोसाइंसेज-PBL) 1000 ग्रॅम एकर किंवा
  • सायझोफॅमिड 34.5% एससी (यूपीएल-रॅनमॅन) 240 मिली/ 300 लीटर एकर किंवा
  • मेटीराम 70% डबल्यु जी (बीएएसएफ-पॉलीराम) 240 ग्रॅम/ 300 लीटर एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या द्राक्ष पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. द्राक्ष वेलीला लागणारे प्रमुख रोग कोणते?

भुरी, करपा आणि केवडा हे द्राक्ष पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी योग्य हवामान कोणते?

द्राक्ष पिकाच्या योग्य शाखीय वाढीसाठी उष्ण व कोरडे वातावरण उपयुक्त ठरते.

3. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड कुठे होते?

महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड नाशिक जिल्ह्यात होते.

61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ