पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Dec
Follow

गूळदरात ४०० रुपयांची वाढ

गेल्या पंधरवड्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने गुजरातमधून गुळाच्या मागणीत वाढ झाली. याचा अनुकूल परिणाम गुळाच्या दरवाढीवर झाला आहे. हंगामाच्या प्रारंभी असणारी गूळदराची मंदी या सप्ताहामध्ये कमी झाली असल्याचे चित्र येथील बाजार समितीतील गूळ बाजारात आहे. येथे आवक होणाऱ्या गुळास क्विंटलला ३६०० ते ४६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हंगामाच्या प्रारंभी गुळाचे दर जास्तीत जास्त ४००० ते क्वचित प्रसंगी ४२०० रुपयांपर्यंत स्थिर होते. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत गुळाची आवकही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ