पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Feb
Follow

हापूसला दर्जानुसार हमीभाव द्या

सिंधुदुर्गनगरी: शासनाने हापूस आंब्याला दर्जानुसार हमीभाव जाहीर करावा. जिल्ह्यातील आंबा उत्पादक गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. बदलत्या वातावरणामुळे तर आंबा उत्पादक मेटाकुटीला आला असून दरातील चढउताराने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. विविध संकटांवर मात करीत आंबा बागायतदार मार्गक्रमण करीत आहेत. मात्र आंबा उत्पादन सुरू झाले तरी त्याला नेमका किती दर मिळेल हे बागायतदाराच्या हातात राहत नाही. उत्पादन कमी असताना देखील अनेकदा कमी दर राहतो. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या हितासाठी ठोस निर्णय घ्यावा. कॅनिंगच्या आंब्याचा दर देखील निश्चित करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ