पोस्ट विवरण
संत्र पिकातील हस्त बहार व्यवस्थापन (Hast Bahar Management in Orange)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.
संत्र हे फळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट स्वाद, चव व आकर्षक नारिंगी रंगांसह संत्र हे पोषक, उत्साहवर्धक, स्वादिष्ट व स्वास्थवर्धक फळ असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे. निसर्गतः संत्र या फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. संत्र पिकातून आर्थिक उत्पादन मिळविण्यासाठी हस्त बहाराची शास्त्रीय दृष्टया निगा राखणे अत्यंत जरुरी असते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया बहार किती व कोणते? हस्त बहार म्हणजे काय? आणि बहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाविषयीची माहिती.
बहार धरणे म्हणजे काय व बहाराचे प्रकार? (What is Bahar treatment in Orange and Mosambi?)
- बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे.
- निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो.
- त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणार्या बहारास मृग बहार
- ऑक्टोबर महिन्यांमध्ये (हस्त नक्षत्रात) येणार्या बहारास हस्त बहार
- तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे (थंडी संपण्याच्या वेळी) येणार्या बहरास आंबिया बहार म्हणतात.
नवती म्हणजे काय? (What is Navati?)
- नवी पाने फुटण्याची (नवीन पालवीची) अवस्था म्हणजेच नवती.
- लिंबूवर्गीय फळ झाडांना बहार येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य वाढीकरता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते.
- अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवती सोबत दिसू लागतात.
- जानेवारी - फेब्रुवारी, जुलै - ऑगस्ट व ऑक्टोंबर हे नवती फुटण्याचे तीन काळ आहेत.
हस्त बहार का घ्यावा?
हस्त बहाराची फळे ही उन्हाळ्यात मिळत असल्यामुळे दर चांगला मिळतो म्हणून हस्त बहार घ्यावा. या करिता बागेत जुलै महिन्यापासून वाफे मोडून पाणी बंद ठेवावे. आडवी उभी मशागत करून बाग तणरहित ठेवावी.
हस्तबहार फोडण्याकरीत खालील प्रमाणे नियोजन करावे:
- खालील फवारणी सप्टेंबर महिन्यात करावी-
- 00:52:34 (देहात - न्यूट्री MKP) - 1.5 किलो + झिंक EDTA 12% (देहात - Zn 12%) 100 ग्रॅम + प्रोपिकोनाझोल 25% ईसी (प्रोपीको) - 300 मिली ही फवारणी 21 ते 30 दिवसांनी परत करावी किंवा
- क्लोरमेक्वाट क्लोराइड 50% एसएल (बी ए एस एफ-लिव्होसीन) किंवा मेपिक्वाट क्लोराइड 5% विकास नियामक (घरडा - चमत्कार) - 300 मिली प्रति 200 ली पाणी ही फवरणी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात (दोन स्प्रे) घ्यावे किंवा
- वरील फवारणी घेतल्यास बाग फुटण्यास मदत होते.
ताण म्हणजे काय व कधी द्यावा?
- झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा व मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे म्हणजे झाडांना ताण देणे.
- बहार धरण्याकरिता जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व अवस्था पाहून ताण द्यावा.
- हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस, भारी जमिनीत 55 ते 65 दिवस ताण द्यावा.
- ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास सायकोसेल 1000 पी पी एम (1000 मिली ग्रॅम प्रति लिटर पाणी)ची फवारणी करावी.
बागेला ताण बसला आहे हे कसे ओळखावे?
- ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत.
- फळे पूर्ण काढून झाल्यानंतर बागेला पाणी देणे बंद करावे.
- ताण सुरु केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात.
- असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.
- साधारणपणे 25 ते 35 टक्के पानगळ झाल्यास झाडाला ताण बसला असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास व नंतर ताण तोडल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि ते व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते.
ओलित व्यवस्थापन (Water Management in Ambia bahar):
- ताण तोडण्याकरीता ऑक्टोबर मध्ये हलके पाणी द्यावे. नंतर 10 दिवसांनी मोठे पाणी देऊन बाग फोडण्याकरीत सोडावे.
- ठिबक ने पाणी देण्यासाठी प्रथम 4-5 तास ठिबक चालवावे, नंतर 3 दिवसांनी कमीतकमी 8 तास ठिबक चालवावे.
- बाग फुटल्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देण्याचे करावे.
संत्री झाडाचा वाफा गवताने आच्छादित करणे:
वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी 6 से.मी. जाडीचा गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकतोच पण फळांची गळसुद्धा कमी होते आणि जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होतात.
खत व्यवस्थापन:
बेसल डोस:
शेणखत 15-20 किलो प्रती झाड + ट्रायकोडर्मा विर्डी 1 .5% डब्ल्यू डी (बीएसीएफ-ट्राइडेंट) - 100 ग्रॅम + फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया (ईफको) - 15 ग्रॅम + पोटॅशिअम मोबिलायझिंग बायोफर्टीलायझर (ईफको) - 15 ग्रॅम
बेसल डोस नंतर 15 दिवसांनी
ईफको डीएपी - 1 किलो प्रती झाड + पोटाश - 500 ग्रॅम किंवा 10:26:26 (महाधन-स्मारटेक)-1500 ग्रॅम
सप्टेंबर मध्ये
SSP (कालगुडी-पारस)- 300 ग्रॅम प्रती झाड +10:26:26 (महाधन-स्मारटेक)-1500 ग्रॅम + 19:19:19 (न्यूट्री-NPK) - 15 ग्रॅम
बाग फुटल्यानंतर सप्टेंबर मध्ये
SSP - 300 ग्रॅम प्रती झाड + 10:26:26 -1500 ग्रॅम + NPK - 15 ग्रॅम
युरिया - 200 ग्रॅम प्रती झाड + पोटाश - 300 ग्रॅम + NPK - 15 ग्रॅम
बहारात बागेची निगा कशी राखावी:
- बहार आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही.
- बहारामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅगनिज सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरिक ऍसिड यांची 0.2 ते 0.5% तीव्रतेची फवारणी करावी.
- संजीवकांचा समतोल साधण्यासाठी 10 पीपीएम एनएएची मार्च महिन्यात फवारणी करावी. या बहारावर 'सिला' नावाच्या किडीचा प्रादुर्भाव असतो. यासाठी मॅलेथिऑन 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बहार धरतांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
- ताण देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
- किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे.
- आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
- झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
- सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची लागवड करावी.
नोट:
- कलमं ही कृषी - विभागाच्या नर्सरीकडून किंवा खात्रीशीर नर्सरी वाल्याकडून घ्यावी
- कलमं आणतांना मुळांना कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कलम लावतांना कीटकनाशक - बुरशीनाशकाची प्रक्रिया करूनच लावावी.
- कलम लावतांना डोळा मातीच्या खाली दबू नये याची काळजी घ्यावी.
- कलमं उंच खुंटीवर बांधलेलीच घ्यावी.
तुम्ही तुमच्या संत्र पिकात हस्त बहाराचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात संत्र कुठे पिकते?
महाराष्ट्रामध्ये संत्र मुख्यतः नागपूर, अमरावती या भागात पिकवली जातात.
2. हस्त बहार का घ्यावा?
हस्त बहाराची फळे ही उन्हाळ्यात मिळत असल्यामुळे दर चांगला मिळतो म्हणून हस्त बहार घ्यावा. या करिता बागेत जुलै महिन्यापासून वाफे मोडून पाणी बंद ठेवावे. आडवी उभी मशागत करून बाग तणरहित ठेवावी.
3. हस्त बहार येण्याचा कालावधी?
हस्त बहार हा साधरणतः ऑक्टोबर महिन्यात फुटतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ