सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हिंगोलीत सोयाबीनच्या दरात किंचित चढ-उतार

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्यबाजारात दरात मागील काही आठवड्यांपासून किंचित चढ-उतार होत आहेत. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४४०० रुपये तर सरासरी ४२२५ रुपये दर मिळाले. दरात फारशी सुधारणा होत नसल्याने येथील धान्य बाजारात सोयाबीनची आवक कमी-अधिक होत आहे. मागील आठवड्यामध्ये ६५५ ते १००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटल मागे १०० ते १५० रुपयांनी चढउतार होत आहेत.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
