पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Nov
Follow
हिरवी मिरचीचे दर घसरले ११ हजारांवरून ११०० रुपयांवर
हंगामाच्या सुरुवातीला हिरव्या मिरचीला साडेसात ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर होता. त्यानंतर आता मिरचीचे दर ११०० ते १५०० रुपये क्विंटलवर आल्याने मिरची उत्पादकांच्या खर्चाची देखील भरपाई होत नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन तालुक्यांत सुमारे ७० हजार हेक्टरवर संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. याच भागात गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची हिरव्या मिरचीच्या लागवडीला पसंती मिळाली आहे. त्यामुळेच हिरव्या मिरचीखालील लागवड क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ