सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हळदीचे दर वाढण्याची शक्यता

या सप्ताहात हळदीच्या किमतींनी उसळी घेतली. स्थानिक व निर्यात मागणी यावर्षी वाढती आहे. एक अंदाजानुसार यावर्षी हळदीच्या उत्पादनातसुद्धा वाढ अपेक्षित आहे; मात्र त्याविषयी खात्री नाही. उत्पादनासंबंधी उलट-सुलट वार्ता येत आहेत. त्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने स्पॉट किमतीत ९ टक्क्यांनी तर एप्रिल फ्युचर्स मध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. स्पॉटच्या तुलनेने मे व जून फ्युचर्स भाव फारसे आकर्षक नाहीत. ते फक्त १ ते २ टक्क्यांनी अधिक आहेत. गेल्या तीन वर्षापेक्षा या वर्षी आवक कमी आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
