पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 May
Follow

हळदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज

या सप्ताहात हळदीच्या भावांसी उच्चांक गाठला. निजामाबादमध्ये हळदीचे भाव २४ मे रोजी सुमारे रु. १८,००० होते. हिंगोलीमध्ये ते रु. १५,५८०, तर सांगलीमध्ये ते (राजापुरी) रु. १८,३०० वर गेले होते. गेल्या फेब्रुवारीपासून हळदीचे भाव सतत वाढत आहेत. या वर्षी उत्पादन कमी झाले; स्थानिक व निर्यात मागणी मात्र वाढती राहिली. भाव वाढत राहिले व साठासुद्धा वाढत राहिला. सध्या बाजारात तेजीचे वातावरण आहे. मे अखेरीस नवीन पिकाची लागवड सुरू होईल. हवामान व नवीन पिकाचे उत्पादन यावर पुढील किमती अवलंबून असतील. मात्र ऑगस्टपर्यंत तरी हे तेजीचे वातावरण कायम राहील असा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये माल विकायचा असेल तर हेजिंग करून कमीत कमी रु. २१,००० भाव सध्या मिळेल.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ