पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
हल्दी
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
11 Oct
Follow

हळद पिकातील करपा रोगाचे नियंत्रण कसे कराल? (How to control Blight disease in turmeric crop?)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

हळद हे मसाल्याचे पीक असून मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हळद या पिकाची शाकीय वाढ पूर्ण होऊन कंद वाढ होते. शाकीय अवस्थेत पानात अन्न साठविले जाते. सातव्या महिन्यानंतर ते कंदाच्या वाढीसाठी वापरले जाते. मात्र रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास रोग व कीड यांच्याकडूनच अन्नाचा वापर केला जातो. परिणामी उत्पादनात घट येते. हळद पिकामध्ये होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपैकी करपा हा महत्वाचा रोग आहे. या रोगाचे वेळीच नियंत्रण न झाल्यास उत्पादनामध्ये 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया, हळद पिकातील करपा रोगाविषयीची व त्याच्या नियंत्रणाविषयीची माहिती.

करपा रोग म्हणजे काय? (Blight Disease in Turmeric):

  • करपा हा एक बुरशीजन्य रोग असून, याची लक्षणे ही रोपाच्या पानांवरती सहजपणे दिसून येतात.
  • करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतो.
  • तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

हळद पिकातील करपा रोगाची लक्षणे आणि कारणे (Symptoms and Causes of Blight Disease in Turmeric crop):

  • मातीमधील जास्त ओलावा, तसेच 25 डिग्री सेन्टीग्रेड पेक्षा जास्त तापमान या रोगास कारणीभूत असते.
  • सकाळी पडणारे धुके व दव या रोगास अनुकूल असते.
  • कॉलेटोटिकम बुरशीमुळे पानांवर अंडाकृती ठीपके पडतात.
  • तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते.
  • टॅफ्रीना या बुरशीमुळे लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते.

हळद पिकातील करपा रोग नियंत्रण (Control of Blight Disease in Turmeric Crop):

  • हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
  • लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • हळद पिकास लागवडीपासून 6 ते 7 महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहीत काढावीत.
  • फुले काढल्यामुळे पूर्ण अन्न पुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.
  • शिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी, त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.
  • हळदीनंतर परत हळदीसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांची फेरपालट करावी.

हळद पिकातील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण (Management of Blight Disease in Turmeric Crop):

  • लागवडीपूर्वी कंद कार्बेन्डाझिम 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये कंद 10 मिनिटे बुडवून ठेवावीत. नंतर सावलीमध्ये सुकवून लागवडीस वापरावीत.
  • खताची मात्रा शिफारसी प्रमाणे द्यावी. नत्र खताचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नये.
  • धुके पडू लागल्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी 2.5 ते 3 मिली किंवा प्सुडोमोनास फ्लुरोसन्स 2.5 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत.
  • रोगाची लक्षणे दिसताच अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात अझिटॉप) 300 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात सिमपेक्ट) 200 मिली प्रति 200 लिटर पाणी फवारणी करावी किंवा
  • प्रोपिकोनाझोल 13.9% + डिफेनोकोनाझोल 13.9% ईसी (GSP - vespa) 200 मिली 200 लिटर पाणी फवारणी करावी किंवा
  • मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबिन 5% डब्ल्यूजी (BASF-कॅब्रिओ टॉप) 600-700 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • टेबुकोनाझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 25% w/w डब्ल्यू जी (Bayer-Nativo) 140 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी (कोरोमंडल-जटायू) 500 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुओपिकोलाइड 62.5 + प्रोपामोकार्ब हाइड्रोक्लोराइड 625 एससी (बायर-इन्फिनिटो) 400-450 मिली प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • एमेटोक्ट्रैडिन 27% + डिमेथोमोर्फ 20.27% एससी (बीएएसएफ-झम्प्रो) 320 से 400 मिली प्रति एकर फवारणी करावी.

तुमच्या हळद पिकात करपा रोगाची कोणती लक्षणे दिसून आली? तुम्ही तुमचे पीक वाचविण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात हळद पिकाची सर्वात जास्त लागवड कुठे होते?

महाराष्ट्रामध्ये हिंगोली, सांगली आणि सातारा या जिल्हांमध्ये जास्त प्रमाणात हळदीची लागवड केली जाते.

2. करपा रोग कशामुळे होतो?

करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतो. तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

3. करपा रोगासाठी काय कारणीभूत असते?

मातीमधील जास्त ओलावा, तसेच 25 डिग्री सेन्टीग्रेड पेक्षा जास्त तापमान या रोगास कारणीभूत असते.

53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ