पोस्ट विवरण
सुने
उर्वरक
कृषि ज्ञान
हरभरा
कृषी ज्ञान
DeHaat Channel
8 Dec
Follow

हरभरा पिकातील खत व्यवस्थापन

हरभरा पिकातील खत व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहातच्या कृषी ज्ञान परिवारात आपले स्वागत आहे. आपण तर जाणताच की, भारतात हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे. महाराष्ट्रात एकूण 13.53 लक्ष हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाचे असून उत्पादन 11.80 लाख टन एवढे आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पिक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अं.से. आणि 21 अं.से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पिक जास्तीत जास्त उत्पादन देते. म्हणूनच या पिकातून जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास महत्वाचे असते ते पिकातील खत व्यवस्थापन म्हणून आजच्या या लेखात आपण हरभरा पिकातील खत व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

हरभरा खतांची मात्रा (chickpea npk dose) खालील 3 पद्धतीने देता येते -

  • युरिया 20 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट (सुपर गोळी) 100 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो
  • डायमोनियम फॉस्फेट 40 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो
  • 12:32:16 - 50 किलो

या पैकी कोणत्याही एका पद्धतीने खते द्यावीत व सोबत न्यूट्री वन बेंटोनाइट सल्फर - 3 किलो + मायक्रोनुट्रीएंट खत 10 किलो द्यावे.

हरभरा पिकामध्ये सल्फरचे फायदे:

1. सल्फरमुळे पिकांमधील अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड चे प्रमाण वाढते.

2. पीक जोमदार येते.

3. पानावर काळोखी आणि हिरवेपणा येतो.

4. फुलांच्या संकेत वाढ होऊन घाटे जास्त लागतात.

5. पिकावर कोणताही रोग येत नाही.

6. फुलगळ कमी होते.

7. पिकावर चकाकी येते दाणे टपोरे व चमकदार दिसतात त्यामुळे भाव चांगला मिळतो.

8. पिकावर मर रोग येत नाही.

फवारणीमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन:

1. हरभरा उगवून आल्यानंतर नंतर 15 ते 20 दिवसांनी 19:19:19 नायट्रोजन, स्फुरद, पोटॅश (देहात-न्यूट्री एनपीके) - 50 ग्रॅम + सीवीड अर्क (कात्यायनी-सीवीड एक्सट्रॅक्ट) 25 मिली प्रति 15 लिटर पाणी फवारणी करावी.

2. हरभरा फुलोरा अवस्थेत आल्यावर 12:61:00 (देहात-न्यूट्री एमएपी) - 1 किलो +कॅल्बोर - 200 ग्रॅम प्रति 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.

3. घाटे पोसत असताना 00:00:50 (देहात-न्यूट्री एसओपी) - 1 किलो + बोरॉन 20% (देहात -DOT) 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी फवारणी करावी.

4. याप्रमाणे हरभरा वाढीच्या स्थितीनुसार फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होईल. प्रत्येक फवारणी मध्ये (देहात-Lokke)स्टिकर - 5 मिली प्रति 15 लिटर पाणी वापरावे.

हरभरा पिकात खत व्यवस्थापन करताना घ्यावयाची सर्वसाधारण काळजी:

1. हरभरा पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच खताचे किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा.

2. असंतुलित अविवेकी, अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकात नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.

3. आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवडून निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे हरभरा पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.

तुमच्या हरभरा पिकाला तुम्ही कोणती खते देता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ