सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Jan
Follow
ई-पीक पाहणीला येणार गती

राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ई-पीकपाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता ४५ हजार सहायक नेमले आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार, 'अॅग्रीस्टॅक' योजनेअंतर्गत 'डीसीएस मोबाईल अॅप'द्वारे १०० टक्के ई-पीकपाहणी पूर्ण केली जाणार आहे. राज्यात यंदा रब्बी हंगामात शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली नाही. परिणामी कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे शासनाने या समस्येची दखल घेत उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी सहायकांची नियुक्ती आधीच केलेली आहे, असे महसूल विभागातून सांगण्यात आले.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
