पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Aug
Follow

'ई-पीकपाहणी'साठी सर्व्हरची क्षमता वाढविली

ई-पीकपाहणी करताना उद्भविणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेतकरी हैराण झालेले आहेत. दरम्यान, आता सर्व्हरची क्षमता वाढविल्यामुळे तांत्रिक दोष दूर झाल्याचा दावा शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप हंगामाची ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून सुरू होत असल्याचे राज्य शासनाने घोषित केले. परंतु त्यासाठी लागणारी तांत्रिक पूर्वतयारी केली नाही. त्यामुळेच १० ते १२ ऑगस्टदरम्यान तीन दिवस पीकपाहणीचे काम बंद पडले. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. शेतकऱ्यांना या काळात भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करता आली नाही. त्यासाठी दिलेले सरकारी उपयोजन (अॅप्लिकेशन) बंद पडले होते, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ