पोस्ट विवरण
सुने
कृषि
बागवानी
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
23 Dec
Follow

पिकामध्ये मधमाशी आकर्षित करण्यासाठीचे उपाय (Importance of Honeybees and Measures to attaract them in Crops)


नमस्कार शेतकरी बंधुनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेतकरी बांधव मुख्यतः मधमाशी पालन हे परागीभवनासाठी करतात. मधमाशी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. मधमाश्या नगदी पिकामध्ये परागीभवनाचे काम करतात तसेच जंगली मधमाशी देखील परागीभवनाचे काम करते. मधमाशी पिकाच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे किटकनाशकांपासून मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. शेतीत किटकनाशकांचा बेसुमार वापर वाढल्यामुळे परागीकरण करणाऱ्या किटकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. आपण घेत असलेल्या 70 टक्के पिकांमध्ये मधमाशीच्या परागीकारणाचे विशेष महत्व आहे. काही पिकांमध्ये परागीकरण वाऱ्या मार्फत देखील होते त्यामुळे त्या पिकांमध्ये फळाची सेटिंग जास्त असते. आजच्या आपल्या या लेखात आपण पिकामध्ये मधमाशी आकर्षित करण्यासाठी काय उपाय करू शकतो याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

मधमाशी आकर्षित करण्यासाठी उपाय:

  • मधमाशांना आकर्षित करणारी झाडे लावावीत. उदा. झेंडू, मोहरी, सूर्यफूल, शेवंती
  • मधमाशांना हानिकारक नसणाऱ्या कीटकनाशकांचीचं फवारणी कारवॉं. जसे की,
  • जैविक कीटकनाशक (व्हर्टिसिलीम लेकॅनी) ,
  • रासायनिक कीटकनाशके (ट्रेसर, डेलिगेट, बेनेव्हिया, बायो ३०३ )
  • कीटकनाशकांचा मर्यादित वापर करावा.
  • मधमाशीची तहान भागविण्यासाठी शेतात ओले बार्दन करून ठेवावे किंवा घमेल्यात ओलसर माती ठेवावी. जेणेकरून मधमाशी शेतात येतील व त्यांची तहान भागेल.
  • मधमाशी अशाच ठिकाणी राहते जिथे त्यांना पाणी आहे फुलांमधील परागरस मिळतो. त्यामुळे त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.

मधमाशांना आकर्षित करण्यासाठी करता येतील असे काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे:

  • लाकडाची फळी घेऊन तिला मधमाशीसाठी निवारा बांधून लटकून ठेवावे.
  • मधमाशी घराची व्यवस्था देखील करता येऊ शकते.
  • शेतात गुळाच्या पाण्याची पोती लटकून ठेवावी.
  • गुळाच्या पाण्याची मडकी भरून ठेवावी.

घरगुती करावयाच्या फवारण्या:

  • काळा गूळ ५ ग्रॅम + ताक - ५ मिली / लिटर .
  • विलायची ७० ग्रॅम + ताक - २ लिटर / २०० लिटर .

फवारणी शक्यतो सूर्यास्तानंतर करावी. याचे कारण म्हणजे सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत मधमाशी प्लॉटमध्ये असते.

तुम्ही तुमच्या पिकामध्ये मधमाशी आकर्षित करण्यासाठी काय करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मधमाशी पिकात कोणती महत्वाची भूमिका बजावतात?

मधमाशा पिकात परागीकरणाची महत्वाची भूमिका बजावतात.

2. मधमाशांना आकर्षित करणारी झाडे कोणती?

झेंडू, मोहरी, सूर्यफूल, शेवंती ही मधमाशांना आकर्षित करणारी झाडे आहेत.

3. मधमाशा नष्ट होण्यामागचे मुख्य कारण काय?

मधमाशा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे ऱ्हास पावत आहेत.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ