पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
पशु पालन
अग्रि प्रोडक्ट्स
पशुपालन ज्ञान
पशु ज्ञान
DeHaat Channel
6 June
Follow

देहात 'व्हेटनोव्हिटा - एच लिक्विड' ने वाढवा जनावरांचे दूध उत्पादन (Increase the milk production of animals with DeHaat 'Vetnovita - H Liquid')

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले स्वागत आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाला ओळखले जाते. पशुपालकांना या व्यवसायातून पैसे मिळतात. सध्याच्या अवस्थेत शेतकरी दूध उत्पादनातून फक्त आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. पशुपालकाचा 60 ते 70टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावरच होतो. दुभत्या जनावरांची वाढ व पोषण हे आहारावरच अवलंबून असते. जनावर सुदृढ असेल तरच जनावराची दुध देण्याची क्षमता वाढते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण एका विशेष उत्पादनाविषयी तसेच दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे. लेखात माहिती दिलेल्या उत्पादनाच्या वापरानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल म्हणूनच लेख शेवटपर्यंत वाचा.

दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये मुख्य पोषक तत्वे आणि त्यांचे विभिन्न स्रोत अत्यंत गरजेचे असतात. इतर जनावरांप्रमाणे दुधाळ पशूंमध्ये सुद्धा पाच पोषक तत्वे ऊर्जा, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे आणि पाण्याची गरज असते. ही सर्व पोषक तत्वे आहारामधून प्राप्त होत असतात. त्यामुळे आहारातून या सर्व घटकांची पुर्तता होईल, याची खातरजमा करून घेणे गरजेचे असते. जेणेकरून शरीरवाढ, गाभणकाळ व दूध उत्पादन योग्य रीतीने घेता येईल. चला तर मग आता दुधाळ जनावरांच्या आहारात महत्वाच्या असणाऱ्या दोन घटकांच्या म्हणजेच खनिजे आणि प्रथिनांच्या महत्वाविषयी जाणून घेऊया.

प्रथिने (Protein):

  • प्रजननासाठी ऊर्जेपेक्षा प्रथिनांना कमी महत्त्व आहे. परंतु प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील वांझपणा व प्रजननाच्या समस्या उद्‍भवू शकतात.
  • दीर्घ काळाकरिता आहारातून प्रथिनांचा पुरवठा कमी असेल तर त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
  • दुधाळ जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त ठेवल्यास त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
  • जनावरांच्या आहारात प्रथिने किंवा युरिया यांचा अवलंब अधिक प्रमाणात केल्यास गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. हे टाळण्यासाठी गाई, म्हशीच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास ऊर्जेचे प्रमाण देखील आहारात वाढवावे.
  • प्रथिनांच्या आहारातील अधिक अवलंबाने गर्भाशयाचा सामू कमी होतो, जो गर्भाशयातील गर्भाला घातक/ अपायकारक ठरू शकतो.
  • त्याचप्रमाणे असे दिसून आले आहे की गाईला गरजेपेक्षा 10 ते 15 टक्के प्रथिने जास्त पुरवल्यास गाईंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कृत्रिम रेतन करावे लागते. दोन वेतांतील व प्रसूतीमधील अंतर वाढते.
  • जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास होणारे परिणाम:
  • रक्तातील युरियाचे प्रमाण वाढते आणि शुक्राणू, अंडाशय व वाढणाऱ्या गर्भास अपायकारक ठरते.
  • शरीरातील संप्रेरकाचा समतोल ढळतो.
  • रक्तातील युरियाच्या अधिक प्रमाणाने ऋतुचक्र विस्कळित होते.

खनिजे (Minerals):

  • उन्हाळा सुरू होण्यापूर्वी दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिजांचा स्तर वाढवावा, जेणेकरून उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.
  • उन्हाळ्यात पोटॅशिअम घामावाटे आणि सोडिअम मुत्रावाटे शरीराबाहेर टाकले जाते, याच कारणामुळे जनावरांत पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम खनिजांची गरज जास्त भासते.
  • जनावरांच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी एकूण 22 खनिज तत्वांची आवश्यकता असते.
  • यामध्ये 7 खनिज तत्त्व अधिक प्रमाणामध्ये तर 15 खनिज तत्वे सूक्ष्म प्रमाणामध्ये आवश्यक असतात.
  • याव्यतिरिक्त ही खनिज तत्त्व दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी, पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी, शरीरामध्ये योग्य चयापचय ठेवण्यासाठी तसेच जनावरांना ऊर्जा मिळवून देण्यासाठी महत्वपूर्व योगदान देतात.

दुधाळ जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे:

  • जनावरांच्या गरजेनुसार त्यांचा आहार ठरवावा.
  • आहारात उच्च गुणवत्तेचा चारा आणि खनिज पूरक मिश्रणांचा समावेश करावा.
  • चाऱ्याच्या गुणवत्तेचे नियमित परिक्षण करावे. ओलाव्यामुळे खराब झालेला चारा जनावरांना देऊ नये.
  • काहीवेळा गवत किंवा हवामानामुळे बुरशी लागलेले खाद्य खाऊ घातल्याने जनावरांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
  • दुधाळ जनावरांना नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी द्यावे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार योग्य लसीकरण आणि जंतनाशक द्यावे.

आता जाणून घेऊया जनावरांच्या आहारात देहात 'व्हेटनोव्हिटा - एच लिक्विड' चे महत्व:

  • जनावरांना देहात 'व्हेटनोव्हिटा - एच लिक्विड' दिल्यास त्यांच्या दूध उत्पादनात हमखास वाढ झालेली दिसून येते.
  • DeHaat 'VetnoVita - H Liquid' हे कासेला निरोगी व मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • DeHaat 'VetnoVita - H Liquid'  जनावरांच्या कासेमधील दूध धारणेच्या क्षमतेत सुधार करते.
  • DeHaat 'VetnoVita - H Liquid' हे स्तनदाह रोगास देखील प्रतिरोधक आहे.
  • तसेच जनावरांची त्वचा निरोगी राखण्यास मदत करते.
  • नवजात जनावरांचे मृत्यू दर घटवण्यास मदत करते.
  • DeHaat 'VetnoVita - H Liquid' हे जनावरांना संतुलित ऊर्जा पुरविते.
  • DeHaat 'VetnoVita - H Liquid' जनावरांना देण्याचे प्रमाण: 10-15 मिली स्तनदा गाईंसाठी.

हे झाले देहातचे एक उत्पादन अशी देहातची अनेक उत्पादने आहेत जी तुमच्या जनावरांना योग्य पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. DeHaat 'VetnoVita - H Liquid' विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. दुधाळ जनावरांना कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता असते?

दुधाळ जनावरांना पाच पोषक तत्वे उर्जा, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे आणि पाण्याची आवश्यकता असते.

2. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

प्रथिनांच्या कमतरतेमुळे वांझपणा व प्रजननाच्या समस्या उद्भवू शकतात.

3. दुधाळ जनावरांना योग्य आहार देणे का महत्वाचे असते?

चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे.

63 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ