पोस्ट विवरण
काबुली हरभऱ्याच्या शेती विषयीची माहिती (Information about cultivation of Chickpea - Kabuli gram)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी काबुली हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. या पिकास शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन ते अडीच दशकामधील काबुली हरभरा लागवडी खालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. शहरी भागात देखील काबुली हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या हरभऱ्याला भाव सुद्धा जास्त मिळतो. या प्रकारच्या हरभरा लागवडीसाठी अंतर देखील अधिक सोडावे लागते, कारण या झाडाचा आकार मोठा असतो. चला तर मग जाणून घेऊया, काबुली हरभऱ्याच्या शेती विषयीची माहिती.
काबुली हरभरा लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Land for Cultivation of Chickpea - Kabuli Gram):
- काबुली हरभरा पिकास मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते.
- वार्षिक 700 ते 1000 मि.मी. पर्जन्यमान असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत हरभऱ्याचे पिक चांगले येते.
- उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.
- साधारणत: 5.5 ते 8.6 सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पिक चांगले येते.
काबुली हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Climate for Cultivation of Chickpea - Kabuli Gram):
- काबुली हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
- विशेषत: पिक 20 दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: 10 अंश ते 15 अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान 25 अंश ते 30 अंश सें.ग्रे. असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते.
काबुली हरभरा लागवड कालावधी (Chickpea - Kabuli Gram Cultivation Period):
काबोली हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.
बीजप्रक्रिया (Chickpea - Kabuli Gram Seeding Process):
- लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया करताना प्रति 1 किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम आणि 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे, बियाणे सावलीत सुकवून पुन्हा 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम पीएसबी (ईफको) चोळावे.
- पूर्व मशागत करताना शेणखत द्यावे.
वाण (Chickpea - Kabuli Gram Varieties):
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या काबुली हरभरा टॉप च्या जाती:
- विराट
- पिकेव्ही - २
- पिकेव्ही - ४
- कृपा
पूर्वमशागत:
- हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पिक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (25 सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात.
- खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे.
- कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.
लागवड पद्धत (Chickpea - Kabuli Gram Cultivation method):
- काबुली हरभरा पेरणीसाठी शक्यतो सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.
- या पिकाला फार खोल नांगरणी न करता, केवळ वखर पाळी मारून 45 सें.मी. x 10 सें.मी. अंतरावर सरी पाडावी.
- वरंब्याच्या माथ्यावर टोकण पद्धतीने 45 सेमी अंतरावर लागवड करावी.
- याकरिता बियाण्याच्या आकारानुसार एकरी 40-50 किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा.
- याद्वारे एकरी एक लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.
- देशी (सुधारीत) तसेच काबुली हरभऱ्याच्या पेरणीसाठी सुधारित पेरणीपद्धतींचा वापर खालील प्रमाणे करता येईल.
- ओलावा कमी असल्यास प्रथम ओलित करावे. वाफसा आल्यानंतर पेरावे.
- पेरणी केल्यानंतर अंकुरण होईपर्यंत आपल्याला पाणी द्यायचे नाही.
खत आणि पाणी व्यवस्थापन (Fertilizer and Water Management in Chickpea - Kabuli Gram):
- पेरणी करताना एकरी 30 किलो युरिया आणि 150 किलो सुपर फॉस्फेट किंवा 50 किलो डीएपी द्यावे.
- सरी पाडलेली असल्याने मोकळे पाणी देता येते.
- पिकाच्या योग्य विकासासाठी (देहात-स्टार्टर) 4 किलो एकरी वापरावे.
- तुषार सिंचनाची सोय असल्यास अधिक परिणामकारक आणि सोपे जाते.
- उगवणी नंतर फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत नक्की पाणी द्यावे.
- 12:61:00 (देहात न्यूट्री-MAP) @3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून वापरावे.
आंतरपिके:
- काबोली हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते.
- काबोली हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे.
- काबोली हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे.
- ऊसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर काबोली हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार काबोली हरभऱ्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या काबोली हरभरा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. काबुली हरभरा पिकाची लागवड कधी करावी?
काबुली हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.
2. काबुली हरभरा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
काबुली हरभरा पिकास मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते.
3. काबुली हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
काबुली हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ