भुईमूग पिकातील पानांवरील टिक्का/ठिपके रोगाविषयीची माहिती आणि व्यवस्थापन!

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भुईमूग हे भारतातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे जे क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भुईमुगाची शेती आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. भुईमूग, हे पीक खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते. याच भुईमूग पिकात होणारा एक महत्वाचा रोग म्हणजे टिक्का रोग. हा रोगजनक बुरशी, सर्कोस्पोरा पर्सोनाटामुळे होणारा आजार आहे. हा रोग प्रामुख्याने जगभरातील भुईमूग पिकावर परिणाम करतो. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या रोगाविषयीची संपूर्ण माहिती.
भुईमूग पिकात टिक्का रोगाची दिसणारी लक्षणे (Symptoms of Leaf spot disease in Groundnut crop):
- पीक 20 ते 30 दिवसांचे असताना रोगाची लक्षणे पाने व फांदीवर दिसून येतात.
- सुरुवातीला तपकिरी रंगाचे गोल किंवा अंडाकार ठिपके खालील पानांवर दिसू लागतात.
- या ठिपक्यांच्या भोवती पिवळी कडा दिसून येते. नंतर हे ठिपके काळसर रंगाचे होतात.
- ठिपक्यांच्या मागील बाजूला पाहिल्यास काळसर रंगाची लहान वर्तुळाकार ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके पानाच्या देठावर देखील दिसून येतात.
- रोगाच्या प्रादुर्भावामुळे खालील पाने गळून जातात.
- भुईमूग पिकाच्या सर्व उत्पादक भागांवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- या रोगामुळे पिकाचे 22% पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.
भुईमूग पिकात टिक्का रोगाचा प्रादुर्भाव कशाप्रकारे होतो?
- टिक्का रोगाचे बीजाणू मागील वर्षीच्या किंवा जुन्या पानांवर, फांद्यांवर, बियाण्यावर सुप्त अवस्थेत असतात.
- हे बीजाणू नवीन पिकावर वाऱ्यामार्फत जातात.
- हवेतील आर्द्रता 80 ते 90 टक्के आणि तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस अशी हवामान स्थिती तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास पानावर पडलेले बीजाणू अंकुरित होऊन रोगाची लागण होते.
- लागण झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी लक्षणे दिसून येतात.
- रोगामुळे तयार झालेल्या ठिपक्यांमध्ये पानाच्या मागील बाजूने अनेक गर्द काळ्या रंगाच्या बीजाणूधानी तयार होतात.
- या बीजाणूधानीमध्ये बुरशीचे बीजाणू तयार होतात.
- हे बीजाणू रोगाचा पुढील प्रसार करतात. याला दुय्यम लागण असे म्हणतात.
भुईमूग पिकातील टिक्का रोगाच्या नियंत्रणाचे उपाय (Management of Leaf spot disease in Groundnut crop):
- अगोदरचे पीक भुईमूग नसावे.
- पिकाची फेरपालट करावी.
- लागवडीसाठी रोगमुक्त रोगप्रतिकारक्षमता असलेल्या बियाण्याची निवड करावी.
- लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.
- पिकाची पाने ओली असताना पिकामध्ये कोणतीही कामे करू नयेत.
- रोगग्रस्त पाने काढून टाकावीत.
- वेळीच तणनियंत्रण करावे.
- जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.
- पेरणीनंतर 40 दिवसांनी कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने किंवा
- पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते किंवा
- मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (नागार्जुन - इंडेक्स) 100 -150 ग्रॅम/एकरी फवारणी करावी किंवा
- रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या भुईमूग पिकामधील टिक्का रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात भुईमूग लागवडीचा हंगाम कोणता?
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
2. उन्हाळी सोयाबीन लागवडीचा योग्य कालावधी कोणता?
ऊन्हाळी भुईमूग पेरणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो.
3. भुईमूग पिकासाठी योग्य जमीन कोणती?
भुईमूग पिकासाठी मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
